मुंबई। इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात सोमवारी (२ मे) ४७ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झाला. हा सामना राजस्थानने ७ विकेट्सने गमावला. राजस्थानचा हा सलग दुसरा पराभव होता. या सामन्यादरम्यान पंचांच्या निर्णयाबद्दलही बरीच चर्चाही झाली. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन यादरम्यान चिडलेलाही दिसला.
नक्की झाले काय?
राजस्थानने कोलकातासमोर (RR vs KKR) १५३ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना १९ व्या षटकावेळी कोलकाताकडून रिंकू सिंग (Rinku Singh) आणि नितीश राणा (Nitish Rana) फलंदाजी करत होते. तसेच हे षटक राजस्थान रॉयल्सकडून प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) टाकत होता. यावेळी सामना कोणाच्याही पारड्यात जाऊ शकतो अशी परिस्थिती होती.
त्यावेळी मैदानावरील पंच नितीन पंडीत (Nitin Pandit) यांनी चौथा चेंडू वाईड (Wide Ball) ठरवला. जे पाहून सॅमसन भडकला. हा चेंडू प्रसिद्ध कृष्णाने आखुड टप्प्याचा टाकला, जो रिकू सिंगला मारता आला नाही. हा चेंडू पंचांनी वाईड दिल्याने निराश झालेल्या सॅमसनने डीआरएस रिव्ह्यूची (DRS) मागणी केली.
https://twitter.com/VaishnaviS45/status/1521190310491336704
पण, हे नाट्य इथेच संपले नाही. या षटकातील अखेरचा चेंडू देखील पंचांनी वाईड ठरवला. यावेळी राणाने स्टंपच्या पुढे येऊन चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याला मारता आला नाही. तसेच यष्टीरक्षक संजू सॅमसनच्या हातूनही चेंडू सुटला. पण या चेंडूलाही वाईड दिल्याने सॅमसन पंचांशी चर्चाही करताना दिसला.
https://twitter.com/nikhilpatel4716/status/1521190929331212288
या घटनांची बरीच चर्चा सोशल मीडियावर झाली. अनेकांनी पंचांना सामनावीर पुरस्कार द्या, अशीही प्रतिक्रिया दिली आहे. यापूर्वीही अनेकदा आयपीएल २०२२ मध्ये पंचांच्या निर्णयांबद्दल प्रश्न उपस्थित राहिले आहेत.
Man of the match 🥶
#KKRvRR #umpiring #umpire #ipl pic.twitter.com/uK527t6svr
— black heart nft (@BlackHeartNFT) May 2, 2022
Game Changer of the match
👇
NITIN PANDIT #KKRvRR #KKRvRR #umpiring #umpire #IPL2022 pic.twitter.com/goIvQ23vMf#KKRvRR pic.twitter.com/PXcmirThFp— Jaik raj🇮🇳 (@raj_jaik) May 2, 2022
कोलकाताने जिंकला सामना
या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, राजस्थानने २० षटकांत ५ बाद १५२ धावा केल्या होत्या. राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसनने ५४ धावांची अर्धशतकी खेळी केली. बटलरने २२ धावांचे आणि शिमरॉन हेटमायरने २७ धावांचे योगदान दिले. कोलकाताकडून टीम साऊदीने २ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या कोलकाताकडून नितीश राणाने सर्वाधिक ४८ धावांची नाबाद खेळी केली. तसेच रिंकू सिंगने नाबाद ४२ धावा केल्या. त्याचबरोबर कर्णधार श्रेयस अय्यरने ३४ धावांची खेळी केली. त्यामुळे कोलकाताने १५३ धावांचे आव्हान १९.१ षटकात ३ विकेट्स गमावत पूर्ण केले आणि सामना जिंकला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
राजस्थानची रुळावरून घसरली गाडी, सलग दुसऱ्या पराभवानंतर कर्णधाराने सांगितली कुठे होतेय चूक?
राजस्थान रॉयल्सचा ‘हा’ धडाकेबाज फलंदाज म्हणतोय, ‘माझी पत्नीच माझी मोठी टीकाकार आणि कोच’
वडील करायचे सिलेंडर डिलेव्हरीचे काम, आता मुलगा आयपीएलमध्ये बनलाय केकेआरचा मॅच विनर