आयपीएल २०२२ चा मेगा लिलाव(IPL 2022 Mega Auction) पार पडल्यानंतर आता चाहते आयपीएलच्या वेळापत्रकाची वाट पाहत आहेत. बीसीसीआयने (BCCI) काही काळापुर्वी यावर्षीच्या आयपीएलचे साखळी सामने मुंबई आणि पुणे येथे पार पडणार असल्याचे सांगितले होते. परंतु आयपीएलच्या (IPL) १५ व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले नव्हते. परंतु रविवारी (६ मार्च) बीसीसीआय वेळापत्रक जाहीर करु शकते.
आयपीएल २०२२ चा पहिला सामना २६ मार्चला खेळला जाणार आहे, तसेच २९ मेला या स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. यावर्षीच्या आयपीएलमध्ये ८ नाही, तर १० संघ खेळताना दिसणार आहेत. लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टाइटन्स या संघांचा समावेश यावर्षीच्या आयपीएलमध्ये करण्यात आला आहे.
मागील काही काळात असे वृत्त समोर आले आहे की, महेंद्रसिंग धोनी कर्णधार असलेल्या चेन्नई सुपर किंग्स आणि श्रेयस अय्यर कर्णधार असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघांमध्ये आयपीएल २०२२ चा पहिला सामना खेळला जाणार आहे. सीएसकेने २०२१ च्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात केकेआरला पराभूत करत चौथा सामना जिंकला होता. यावर्षी ७४ सामने खेळले जाणार आहेत. त्यामध्ये ७० लीग तर ४ प्लेऑफचे सामने खेळले जाणार आहेत.
आयपीएलचा १५ व्या हंगामामध्ये बदल करण्यात आले आहेत. यावेळी १० संघांना ५ -५ संघांच्या दोन गटांमध्ये विभागण्यात आले आहे. प्रत्येक संघ १४ सामने खेळणार आहे. बीसीसीआयने शुक्रवारी संघांच्या गटांचा खुलासा केला आहे. यामध्ये सर्व संघ कोणत्या संघासोबत किती सामने खेळणार याचा समावेश करण्यात आला आहे.
मुंबई इंडियन्स, कोलकत्ता नाइट राइडर्स, राजस्थान राॅयल्स, दिल्ली कॅपीटल्स आणि लखनऊ सुपरजायंट्स संघांना ए गटात तर चेन्नई सुपर किंग्स, राॅयल चॅलेजर्स बॅंगलोर , पंजाब किंग्स, सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टाइटन्स संघांना बी गटात स्थान देण्यात आले आहे.
आयपीएलच्या १५ व्या हंगामाच्या सरावाला सर्व संघ १४ मार्चपासून करणार आहेत. संघांना सरावासाठी ५ ठिकाणे देण्यात आली आहेत. मुंबई क्रिकेट संघाच्या बांद्रा कुर्ला परिसर, ठाण्यातील एमसीए स्टेडीयम, डीवाय पाटील विश्वविद्यालय मैदान, सीसीआई फूटबाॅल मैदान आणि घनसोली रिलायन्स कार्पोरेट पार्क मैदान ही ५ ठिकाणे सरावासाठी असतील. खेळाडू ८ मार्चपर्यंत या ठिकाणी सरावासाठी पोहचण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
रविंद्र जडेजासोबत शेन वॉर्नचे नाते होते खूप खास, सीएसकेने शेअर केला जुना फोटो
विराट की स्मिथ? शेन वॉर्नने सांगितलं होतं उत्कृष्ट कसोटी फलंदाज कोण ते…
काय सांगता! ब्रँडीच्या बॉटलमुळे सुरू झाला होता महिला क्रिकेटचा ‘विश्वचषक’, खूपच रंजक आहे कहाणी






