---Advertisement---

‘भाऊ बरं झालं तुला मुंबईने खेळवले नाही’, शोएब अख्तरने वाढवला लखनऊच्या युवा गोलंदाजाचा आत्मविश्वास

On: बुधवार, मे 25, 2022 10:57 PM
Lucknow-Super-Giants
---Advertisement---

वेगवान गोलंदाज मोहसिन खान आयपीएल २०२२ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळत आहे. यापूर्वी त्याने मुंबई इंडियन्ससोबत तीन वर्ष घालवली. परंतु त्यांच्या संघात असताना मोहसिनला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. पाकिस्तानचा माजी दिग्गज शोएब अख्तर आता याच विषयावर व्यक्त झाला आहे. अख्तरच्या मते मुंबईकडून मोहसिनला जरी खेळण्याची संधी मिळाली नसली, तरी त्यांच्यासोबतचा कर्यकाळ त्याच्यासाठी महत्वाचा राहिला आहे.

भारताचा २३ वर्षीय वेगवान गोलंदाज मोहसिन खान (Mohsin Khan) याच्याविषयी शोएब अख्तरने मत मांडली आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना शोएब अख्तर (Shoaib Akhtar) म्हणाला की, “जेव्हा जग तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न करते, तेव्हा समजून घेतले पाहिजे की, तुमच्याकडे योग्यता आहे. मोहसिन खानला मुंबई इंडियन्सने संधी दिली नाही. मी म्हणतो भाऊ तुझ्यासाठी हे चांगले होते की, मुंबई इंडियन्सने तुला खेळवले नाही. कारण, तू दुसऱ्या संघासाठी स्वतःची तयारी करत होता.”

लखनऊ सुपर जायंट्सला बुधवारी (२५ मे) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसोबत आयपीएल २०२२चा एलमिनेटर सामना खेळायचा होता. या सामन्याच्या आधी अख्तरची ही प्रतिक्रिया आली होती. अख्तरच्या मते हंगामात मोहसिनने आतापर्यंत केलेले प्रदर्शन पुरेसे नाहीये आणि आरसीबीविरुद्धच्या सामन्यात त्याला अजून विकेट्स घ्यावा लागतील. “आतापर्यंत तू १३ विकेट्स घेतल्या आहेत, ज्या कमी आहेत.  त्यामुळेच आजच्या मोठ्या सामन्यात विकेट घे आणि तुझा राग बाहेर काढ.”

यावेळी चर्चेत वेस्ट इंडीजाच अष्टपैलू जेसन होल्डर देखील उपस्थित होती. होल्डरला आवेश खान आणि मोहसिन खान या वेगवान गोलंदाजांच्या जोडीविषयी प्रश्न विचारला गेला. यावर होल्डरने देखील या दोघांच्या जोडीचे कौतुक केले. दरम्यान, मोहसिन खानचे चालू आयपीएल हंगामातील प्रदर्शन पाहिले, तर त्याने नऊ सामन्यात १४ विकेट्स घेतल्या. यादरम्यान त्याने १४.०७च्या सरासरीने विकेट्स घेतल्या, तर अवघ्या ५.९७च्या इकॉनॉमी रेटने धावा खर्च केल्या. टी२० क्रिकेटमध्ये मोहसिनचे हे आकडे खरोखर कौतुकास पात्र आहेत.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

सुंदर साडी अन् नाकात नथ, मराठमोळ्या अंदाजात खूपच देखणी दिसतेय सचिनची लाडकी लेक, पाहा फोटो

‘विराटची साथ मिळाली, तरच….’, LSG vs RCB सामन्यापूर्वी विरेंद्र सेहवागचे मोठे वक्तव्य

आयपीएल २०२२च्या फायनलमध्ये दिमाखात पोहोचली नवखी टीम गुजरात टायटन्स, ‘या’ खेळाडूंचे आहे मोलाचे योगदान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---