धोनीची आक्रमक फलंदाजी पाहून श्रेयस अय्यरला आलेलं टेंशन, सामन्यानंतर म्हणाला…

धोनीची आक्रमक फलंदाजी पाहून श्रेयस अय्यरला आलेलं टेंशन, सामन्यानंतर म्हणाला...

आयपीएल २०२२ च्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्जला मात दिली. केकेआरने हा सामना ६ विकेट्स राखून जिंकला. केकेआराचा कर्णधार श्रेयस अय्यर ने सामना जिंकल्यानंतर त्याची खास प्रतिक्रिया दिली. सीएसकेला या सामन्यात पराभव पत्कराला लागला असला, तरी त्याचा माजी कर्णधार एमएस धोनी याने अप्रतिम प्रदर्शन केले. श्रेयसच्या म्हणण्यानुसार धोनी जोपर्यंत खेळपट्टीवर होता, तोपर्यांत त्याला चिंता लागून होती.

नाणेफेक जिंकून केकेआरने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रवींद्र जडेजाच्या नेतृत्वातील सीएसकेने मर्यादित २ षटकांमध्ये ५ विकेट्सच्या नुकसानावर १३१ धावा केल्या. प्रत्युत्तरात केकेआरने १८.३ षटकांमध्ये ४ विकेट्सच्या नुकसानावर लक्ष्य गाठले. असे असले तरी, एमएस धोनीने त्याच्या संघासाठी ३८ चेंडूत महत्वाच्या ५० धावा ठोकल्या. धोनी खेळला नसता, तर सीएसकेची अवस्था अजूनच खराब होऊ शकली असती.

श्रेयसच्या मते एमएस धोनी (MS Dhoni) जेव्हा चांगली फलंदाज करत असतो, तेव्हा चिंता वाढतेच. सामन्यादरम्यान मैदानात दव पडल्यामुळे चेंडू गोलंदाजांच्या हातातून निसटत असल्याचेही त्याने सांगितले.

सामना जिंकल्यानंतर केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) म्हणाला, “आम्हाला ही लय पुढे कायम ठेवायची आहे. धोनी जेव्हा फलंदाजीसाठी करतो, तेव्हा तुम्ही (विरोधी संघ) नक्कीच दबावात असता. मला माहिती होते की, शेवटच्या तीन षटकांमध्ये सामना त्यांच्या बाजूने झुकत आहे. गोलंदाजांना चेंडू पकरण्याता अडचण येत होती.”

केकेआरचा अनुभवी वेगवान गोलंदाज उमेश यादवने या सामन्यात दोन महत्वाच्या विकेट्स घेतल्या. सीएसकेचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि डिवॉन कॉन्वे उमेश यादवच्या चेंडूचे शिकार बनले आणि स्वस्तात विकेट गमावली. उमेश यादवच्या कौतुक श्रेयस म्हणाल, “उमेश यादव नेट्समध्ये आणि सराव सत्रात खूप मेहनत घेत होता आणि आज त्याने चांगले प्रदर्शन करताना पाहून चांगले वाटत आहे.”

उत्कृष्ट गोलंदाजीसाठी उमेश यादव (Umesh Yadav) याला जेव्हा सामनावीर निवडले गेले, तेव्हा तो म्हणाला, “अशी संधी कधी-कधीच येत असते. माझ्यासाठी ही संधी (सामनावीर) दोन वर्षांनंतर आली आहे. पॉवर प्लेमध्ये विकेट्स घेणे गरजेचे होते. मला याचा आनंद आहे की, संघाने जी भूमिका दिली, ती मी चांगल्या प्रकारे पार पाडू शकलो.”

महत्वाच्या बातम्या –

हार्टब्रेक! दक्षिण आफ्रिकेने हिसकावला हातातोंडाशी आलेला घास, भारताचा ३ विकेट्सने पराभव; विश्वचषकातूनही बाहेर

आजचा सामना: कधी, केव्हा आणि कुठे होणार पंजाब-बेंगलोर सामना, जाणून घ्या एका क्लिकवर

ड्वेन ब्रावो बनला ‘नंबर १’, आयपीएलमधील मोठ्या विक्रमात लसिथ मलिंगाशी साधली बरोबरी

Next Post

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.