आयपीएल (IPL) ही जगातिल सर्वात मोठी टी-२० लीग आहे. आयपीएलमध्ये जगभरातील अनेक मोठे दिग्गज खेळताना दिसले आहेत. आयपीएलमध्ये खेळण्याच्या मोबदल्यात त्यांना खूप पैसाही मिळतो आणि युवा खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्याची संधीही मिळत असते. आयपीएल २०२२ (IPL २०२२) पूर्वी बीसीसीआयने मेगा लिलावाचे (MEGA AUCTION) आयोजन केले आहे, परंतु विदेशातील अनेक खेळाडू आहेत, ज्यांनी यावर्षीच्या लिलावात सहभाग घेतला नाहीय. दक्षिण अफ्रिकेचा कसोटी कर्णधार डीन एल्गर (dean elgar) देखील मेगा लिलावात सहभागी होणार नाहीय. एल्गरने यामागचे कारण स्पष्ट केले आहे.
आयपीएल २०२२ साठी १२ आणि १३ फेब्रुवारीला बेंगलोरमध्ये मेगा लिलाव होणार आहे. यावर्षी लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे दोन नवीन संघ स्पर्धेत सामील होणार असल्यामुळे लिलाव अधिकच रंजक बनणार आहे. दक्षिण अफ्रिकेचा कसोटी कर्णधार डीन एल्गर मात्र या मेगा लिलावात दिसणार नाही. एल्गरने स्वतःच्या देशासाठी आतापर्यंत टी-२० पदार्पणही केले नाहीय. आयपीएलच्या मेगा लिलावासाठी नाव देण्याविषयी बोलताना त्याने सांगितले की, तो पैशापेक्षा क्रिकेटला जास्त महत्व देतो.
मेगा लिवासाठी चाहतेही उत्सुक –
दरम्यान, आयपीएल २०२२ मधील मेगा लिलावात आनेक दिग्गज खेळाडूंवर बोली लागताना दिसणार आहे. मागचा हंगाम संपल्यानंतर बीसीसीआयने प्रत्येक आयपीएल संघाला चार खेळाडू रिटेन करण्याची संधी दिली होती आणि उरलेले सर्व खेळाडू लिलावात सहभागी होणार आहेत. मेगा लिलावासाठी भारतालील आणि विदेशातील एकूण १२१४ खेळाडूंना स्वतःचे नाव नोंदवले होते, परंतु त्यातील ५९० खेळाडूंची यादी निश्चित करण्यात आली आहे, ज्यांच्यावर लिलावात प्रत्यक्ष बोली लागेल.
गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या नवीन फ्रेंचायझींनाही बीसीसीआयने प्रत्येकी तीन खेळाडूंना रिटेन करण्याची संधी दिली होती. दोन्ही नवीन फ्रेंचायझींमुळे मेगा लिलावात फ्रेंचायझींमधील संघर्ष पाहण्यासारखा असेल. मेगा लिलावात इतर संघांप्रमाणेच या नवीन फ्रेंचायझीही चांगल्या खेळाडूंचा संघ तयार करण्याच्या प्रयत्नात दिसतील. चाहतेही मेगा लिलावाची वाट बघत आहेत.
महत्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२२ : दिग्गज मंडळींसह ‘हे’ परदेशी युवा खेळाडू उतरणार मेगा ऑक्शनमध्ये , पाहा संपूर्ण यादी
आयपीएलचा मेगा लिलाव करणारे ह्युज एडमिड्स आहेत तरी कोण?
या कॅचला तोड नाही! रिषभ पंतने यष्टीमागे डाईव्ह मारत टिपला ‘सुपरमॅन’ स्टाईल झेल