दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील अंतिम आणि निर्णायक कसोटी सामना केपटाऊनच्या (Cape town) मैदानावर सुरू आहे. या सामन्यात विजय मिळवण्यासाठी भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका संघासमोर २१२ धावांचे आव्हान दिले आहे. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाने तिसऱ्या दिवस (१३ जानेवारी ) अखेर २ बाद १११ धावा केल्या आहेत. विजयाची समान संधी असताना दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. दरम्यान, दुसऱ्या डावात विराट कोहली (Virat Kohli) आणि डीन एल्गर (Dean Elgar) यांच्यात बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका संघाला विजयासाठी २१२ धावांचे आव्हान दिले आहे. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ डीन एल्गरला बाद करण्याच्या प्रयत्नात होता. कारण गेल्या सामन्यात डीन एल्गरने नाबाद ९६ धावांची खेळी करत दक्षिण आफ्रिका संघाला विजय मिळवून दिला होता. ज्यावेळी डीन एल्गर फलंदाजीला आला. त्यावेळी कर्णधार कोहली आणि डीन एल्गर या दोन्ही खेळाडूंमध्ये शाब्दिक वाद रंगायला सुरुवात झाली होती. हे सर्व स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झालं आहे.
हा सर्व प्रकार दुसऱ्या डावातील १२ व्या षटकात घडला. त्यावेळी विराट कोहली डीन एल्गरचे लक्ष भटकवण्याचा विचार करत होता. डीन एल्गर जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर रक्षात्मक शॉट खेळत होता. त्यावेळी विराट कोहलीने डीन एल्गरवर निशाणा साधत म्हटले की, “अविश्वसनीय, गेल्या सामन्यात सामनावीर ठरला होता आणि आता जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर पळ काढतोय.”
यावर डीन एल्गर काहीतरी म्हणाला. त्यानंतर पुन्हा एकदा विराट कोहली म्हणाला की, “मी १३ वर्षांपासून अशीच बडबड करत आहे डीन. तुला वाटतं का की, तू मला शांत ठेवशील? २०१८ मध्ये जोहान्सबर्ग येथे होणारा सामना रद्द व्हावा अशी कोणाची इच्छा होती हे आपल्या सर्वांना माहीत आहे.” यावर डीन एल्गरने कुठलीही प्रतिक्रीया दिली नाही.
https://twitter.com/CdSawan/status/1481689560862294018
https://twitter.com/BeingDope_007/status/1481666360749203456
https://twitter.com/Kushupadhyay_18/status/1481871171411128322
त्यानंतर पुढील काही षटकात आणखी मोठा वाद झाला. पंचांनी डीन एल्गरला बाद घोषित केल्यानंतर डीआरएसमध्ये तो नाबाद असल्याचे दिसून आले होते. या सर्व प्रकरणात भारतीय खेळाडूंनी स्टंप माईकमध्ये सुपरस्पोर्टला खडेबोल सुनावले होते.
महत्वाच्या बातम्या :
धोनी नाही, ना संगकारा ना इतर कुणी; विक्रमाच्या ‘या’ खास यादीत केवळ पंत आणि गिलख्रिस्ट
शमीने ‘त्या’ आफ्रिकन फलंदाजाला बनविले ‘बकरा’; मालिकेत दिली नाही स्थिरावण्याची संधी
हे नक्की पाहा: