Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शमीने ‘त्या’ आफ्रिकन फलंदाजाला बनविले ‘बकरा’; मालिकेत दिली नाही स्थिरावण्याची संधी

January 14, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या, भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा
M SHAMI

Photo Courtesy: Twitter/ICC


दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाच्या अडचणी वाढल्याचे दिसत आहे. सामन्यात विजय मिळवण्यासाठी दक्षिण अफ्रिकेला अजून १११ धावांची आवश्यकता आहे. तर, दुसरीकडे भारतीय संघाला विजयासाठी ८ विकेट्स घेणे गरजेचे आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दक्षिण अफ्रिकेने त्यांच्या दुसऱ्या डावात दोन विकेट्स गमावल्या आणि १०१ धावा केल्या. दक्षिण अफ्रिकेचा सलामीवीर ऐडन मार्करम १६ धावा करून मोहम्मद शमीच्या चेंडूवर तंबूत परतला.

दक्षिण अफ्रिकेने सामन्यातील त्यांच्या दुसऱ्या डावाची चांगली सुरुवात केली होती. ऐडन मार्करम (Aiden markam) चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता आणि एकापाठोपाठ एक चौकार मारत चालला होता. तसेच कर्णधार डीन एल्गर देखील त्याची चांगली साथ देत होता. मार्करमने २२ चेंडूंमद्ये १६ धावा केल्या आणि भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami) याच्या चेंडूचा शिकार झाला. दुसऱ्या डावातील आठव्या षटकात मोहम्मद शमी गोलंदाजीसाठी आला होता. त्याने षटकातील तिसऱ्या चेंडूवर मार्करमची विकेट घेतली. हा चेंडू मार्करमच्या बॅटला लागून स्लीपमध्ये उभा असलेल्या केएल राहुलच्या हातात गेला.

दरम्यान, ही या कसोटी मालिकेतील चौथी वेळ आहे, जेव्हा मोहम्मद शमीने मार्करमची विकेट घेतली. मार्करम या मालिकेत खेळलेल्या सहा डावांपैकी चार वेळा मोहम्मद शमीच्याच चेंडूवर बाद झाला आहे.

मोहम्मद शमीने दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या या तिसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात देखील एक खास विक्रम स्वतःच्या नावावर नोंदवला. पहिल्या डावादरम्यान तो सेना देशात (दक्षिण अफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये स्वतःच्या २०० विकेट्स पूर्ण करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सामील झाला.

कसोटी मालिकेचा विचार केला, तर भारताने सेंचुरियनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात ११३ धावांनी विजय मिळवला होता आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात यजमान संघाने सात विकेट्सने विजय मिळवून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. आता उभय संघातील या तिसऱ्या सामन्यात जो संघ विजय मिळवेल तो कसोटी मालिका देखील जिंकेल.

महत्वाच्या बातम्या –

जिथे कॅमेरा पोहोचेना तिथे पोहोचला पंतचा षटकार आणि सुरु झाली चेंडूची शोधाशोध; पाहा व्हिडिओ

चेन्नईयनने हैदराबादला बरोबरीत रोखले

रिषभच्या शतकाने भारावला भारतीय दिग्गज; एक नव्हे दोन ट्विट करत केले कौतुक

व्हिडिओ पाहा –


Next Post
africa-test

...आणि बुमराहला बाद करताच १४५ वर्षांत न झालेला पराक्रम दक्षिण आफ्रिकेच्या नावे झाला जमा; वाचा सविस्तर

jemsen-rabada

पहिल्याच मालिकेत विक्रमवीर ठरला प्रतिभावंत जेन्सन; रबाडाने केली कमाल

BUTLLER STOKES

आयपीएलमध्ये नाही दिसणार इंग्लिश खेळाडू?

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143