आयपीएल २०२२ च्या २१ व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन संघ आमने सामने होते. हा सामना मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये खेळला गेला. या सामन्यात गुजरात टायटन्स नाणेफेक गमावली आणि संघाला प्रथम फलंदाजी करावी लागली. गुजरात फलंदाजीसाठी आल्यानंतर त्यांचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलवर सर्वांच्या नजरा लागून होत्या, पण तो अपेक्षित खेळी करू शकला नाही. हैदराबादच्या राहुल त्रिपाठीने एक उत्कृष्ट झेल घेत गिलला तंबूत माघारी धाडले.
सलामीवीर फलंदाज शुभमन गिल (Shubamn Gill) या सामन्यात ९ चेंडूत ७ धावा करून बाद झाला. गिल मोठी खेळी करू शकत होता, पण राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) याने अनपेक्षित झेल घेत त्याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्याला बाद करण्यासाठी १०० टक्के गुण राहुलला जातात, कारण गिलने खेळलेल्या शॉटमध्ये कोणतीही कमतरता दिसली नव्हती.
राहुल त्रिपाठी सर्कलच्या आतमध्ये कवर्सच्या दिशेला क्षेत्ररक्षणासाठी उभा होता. गिलने एक कडक शॉट खेळला, पण त्रिपाठीने उत्कृष्ट डाईव्ह मारून तो एका हातात झेलला. त्रिपाठीने हा झेल घेण्यासाठी दाखवलेल्या चhळाईचे चाहत्यांकडून कौतुक केले जात आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
https://twitter.com/rishobpuant/status/1513521473612238852?s=20&t=UYoh8YM174jQzpoF-V51Hw
राहुल त्रिपाठीने घेतलला हा झेल हंगामातील सर्वोत्कृष्ट झेल देखील ठरू शकतो. गिलने विकेट गमावली त्यावेळी अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार गोलंदाजी करत होता. त्याची विकेट गमावण्यापूर्वी गुजरात टायटन्स संघ योग्य दिशेने पुढे चालला होता. गुजरातने सुरुवातीच्या दोन षटकांमध्ये एकही विकेट न गमावता २४ धावा केल्या होत्या. गिलच्या रूपात संघाला पहिलाच झटका बसला. डावाच्या पहिल्या षटकात भुवनेश्वरच्या खराब लाईन लेंथमुळे गुजरातला १७ धावा मिळाल्या होत्या.
दरम्यान, तिसऱ्या षटकात शुभमन गिलची विकेट मिळने सनरायझर्स हैदराबादसाठी खूपच महत्वाचे होते. कारण हा युवा फलंदाज आयपीएल २०२२ मध्ये आतापर्यंत चांगल्या फॉर्ममध्ये दिसला आहे. गिलच्या विकेटनंतर गुजरात संघ नियमित अंतराने त्यांच्या विकेट्स गमावत गेला आणि मर्यादित २० षटकांमध्ये ७ विकेट्सच्या नुकसानावर १६२ धावा केल्या. हार्दिक पांड्याने कर्णधारपदाला साजेशी ५० धावांची खेळी केली.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
संघ मालकीन निता अंबानींपर्यंत गेली बातमी, मुंबईच्या चौथ्या पराभवानंतर खेळाडूंना फोन करत म्हणाल्या…
एकच पण जबरदस्त! हार्दिक पंड्याची सनरायझर्स विरुद्ध खास ‘सेंच्यूरी’, थेट विश्वविक्रमाला गवसणी
राजस्थान रॉयल्सच्या विजयाचा नायक ठरलेला ‘रीवा एक्सप्रेस’, वडील चालवतात हेअर सलून; वाचा त्याची कहाणी