---Advertisement---

IPL2022| हैदराबाद वि. लखनऊ सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!

On: सोमवार, एप्रिल 4, 2022 12:06 PM
SRH-vs-LSG
---Advertisement---

मुंबई। सोमवारी (४ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामातील १२ वा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघात होणार आहे. हा सामना डॉ. डी वाय पाटील स्पोर्ट्स ऍकेडमी येथे होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरुवात होणार असून संध्याकाळी ७ वाजता नाणेफेक होईल. दरम्यान, या सामन्यासाठी कशी ड्रीम ११ असू शकते हे पाहू.

असा असू शकतो सनरायझर्स हैदराबादचा संभावित संघ 
केन विलियम्सन (Kane Williamson) यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा सनरायझर्स हैदराबाद संघ यंदाच्या आयपीएल हंगामात अद्याप एकच सामना खेळला आहे. यातही त्यांना राजस्थान रॉयल्सविरुद्ध मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. लखनऊ विरुद्धच्या सामन्यासाठी हैदराबादच्या संभावित ११ जणांच्या (SRH Predicted XI) संघाबद्दल बोलायचे झाल्यास कर्णधार विलियम्सन युवा अभिषेक शर्मासह सलामीला उतरू शकतो.

तसेच राहुल त्रिपाठी, एडेन मार्करम, निकोलस पूरन यांना मधली फळी सांभाळावी लागणार आहे, तर अष्टपैलू म्हणून अब्दूल सामदला वॉशिंग्टन सुंदरसह संधी मिळू शकते. तसेच रोमारिया शेफर्डही त्यांना साथ देऊ शकतो. याबरोबरच गोलंदाजीची सर्वाधिक भिस्त भुवनेश्वर कुमार, टी नटराजन आणि उमरान मलिकवर असू शकते.

सनरायझर्स हैदराबादचा संभावित संघ – केन विलियम्सन (कर्णधार), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडेन मार्करम, निकोलस पूरन, अब्दुल सामद, वॉशिंग्टन सुंदर, रोमारियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक.

असा असू शकतो लखनऊ सुपर जायंट्सचा संभावित संघ 
लखनऊ सुपर जायंट्स संघ यंदाच्या हंगामात नव्याने सामील झाला आहे. त्यांना या स्पर्धेत आत्तापर्यंत केएल राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वाखाली २ सामने खेळले आहेत. यातील त्यांना पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध पराभव स्विकारावा लागला, तर चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध त्यांनी विजय मिळवला. आता त्यांना तिसरा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळायचा आहे.

लखनऊ सुपर जायंट्सच्या संभावित ११ जणांच्या संघाबद्दल (LSG Predicted XI) बोलायचे झाल्यास कर्णधार राहुलसह यष्टीरक्षक फलंदाज क्विंटॉन डी कॉक सलामीला उतरू शकतो. तसेच मधल्या फळीची जबाबदारी मनिष पांडे, एव्हिन लुईस, दीपक हुडा, आयुष बदोनी यांच्यावर असून शकते. त्याचबरोबर अष्टपैलू म्हणून कृणाल पंड्या आणि जेसन होल्डर संघात स्थान मिळवू शकतात. तर गोलंदाजीची जबाबदारी रवी बिश्नोई, दुश्मंता चमिरा आणि अवेश खान यांच्यावर असू शकेल.

लखनऊ सुपर जायंट्सचा संभावित संघ – केएल राहुल (कर्णधार), क्विंटॉन डी कॉक (यष्टीरक्षक), मनिष पांडे, एविन लुईस, दीपक हुडा, आयुष बदोनी, कृणाल पंड्या, जेसन होल्डर, रवी बिश्नोई, दुश्मंथा चमीरा, अवेश खान.

अशी असू शकते ड्रीम ११ 
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स (SRH vs LSG) यांच्यात होणाऱ्या सामन्यातील ड्रीम ११ बद्दल (Dream XI) विचार करायचा झाल्यास यष्टीरक्षक म्हणून क्विंटन डी कॉकला संधी दिली जाऊ शकते. तसेच फलंदाजीत केएल राहुल, केन विलियम्सन, राहुल त्रिपाठी, एडेन मार्करम यांना स्थान दिले जाऊ शकते. त्याचबरोबर अष्टपैलू खेळाडू म्हणून जेसन होल्डर आणि दीपक हुडा यांची निवड करू शकतो. त्याचबरोबर गोलंदाजीत दुश्मंथा चमिरा, उमरान मलिक, भुवनेश्वर कुमार आणि अवेश खान यांना संधी दिली जाऊ शकते. त्याचबरोबर केएल राहुलला कर्णधार आणि जेसन होल्डरला उपकर्णधार केले जाऊ शकते.

कर्णधार – केएल राहुल
उपकर्णधार – जेसन होल्डर
यष्टीरक्षक – क्विंटन डी कॉक
फलंदाज – केएल राहुल, केन विलियम्सन, राहुल त्रिपाठी, एडेन मार्करम
अष्टपैलू – जेसन होल्डर, दीपक हुडा
गोलंदाज – दुश्मंथा चमिरा, उमरान मलिक, भुवनेश्वर कुमार, अवेश खान

महत्त्वाच्या बातम्या – 

IPL 2022| केव्हा आणि कसा पाहाल हैदराबाद वि. लखनऊ सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही

एकदाच खेळले पण टिच्चून खेळले! आयपीएल इतिहासातील केवळ एक सामना गाजवणारे भारतीय खेळाडू

काय सांगता! गिलख्रिस्टने संपूर्ण कारकिर्दीत घेतली एकच विकेट, तीही आयपीएलमध्ये, ‘हा’ खेळाडू ठरला होता बळी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---