आयपीएलमध्ये चार वेळा विजेतेपद पटकावलेल्या चेन्नई सुपर किंग्ससाठी आयपीएल २०२२ हंगामाची सुरुवात निराशाजनक झाली आहे. पहिल्या सामन्यात सीएसकेला कोलकाता नाईट रायडर्स आणि दुसऱ्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स यांच्याकडून पराभव पत्करला आहे. गुरुवारी (३१ मार्च) सीएसके आणि लखनऊ सुपर जायंट्स (CSK vs LSG) यांच्यात झालेल्या सामन्यात लखनऊने ६ विकेट्स राखून विजय मिळवला. सीएसकेच्या पराभवाचे खापर अष्टपैलू शिवम दुबेवर फुटले. अशात सीएसकेचे प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग (Stephen Fleming) यांनी पराभवाचे मुख्य कारण स्पष्ट केले आहे.
सामन्याच्या अंतिम घटकांमध्ये लखनऊला विजयासाठी २ षटकांमध्ये ३४ धावांची आवश्यकता होती. सीएसकेचा कर्णधार रवींद्र जडेजाने १९ व्या षटाकात शिवम दुबे (Shivam Dube) याला गोलंदाजी दिली आणि त्याने या षटकात तब्बल २५ धावा खर्च केल्या. त्यानंतर लखनऊला विजयासाठी शेवटच्या षटकात ९ धावांची गरज होती. एविन लुईस आणि आयुष बदोनी यांच्या तुफानी खेळीमुळे लखनऊने ३ चेंडू शिल्लक ठेऊन विजय मिळवला.
सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना सीएसकेचे प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांनी पराभवाचे कारण स्पष्ट केले. ते म्हणाले की, ‘जर तुम्ही आधिच्या परिस्थितीवर नजर टाकली, तर फिरकी गोलंदाजांचा पर्याय वापरला जाऊ शकत नव्हता. कारण जोपर्यंत दवाचा प्रश्न आहे, तर ते नायगरा वॉटरफॉल (Niagara Falls) प्रमाणे होती.’
प्रशिक्षकांच्या मते दव पडल्यामुळे चेंडूवर व्यवस्थित पकडणे अवघड झाले होते. फ्लेमिंगने असेही सांगितेल की, ‘सामन्यात आम्ही काही युवा खेळाडूंना आजमावले. मुकेश पहिल्यांदाच खेळत होता, तुषार देशपांडेने याआधी काही सामने खेळले आहेत. पण खरे तर हेच आहे की, गोलंदाजी करणे कठीण होते. चेंडू आणि मैदान खूप ओले होते.’
दरम्यान, सामन्याचा विचार केला, तर लखनऊचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना सीएसकेने ७ विकेट्सच्या नुकसनानावर २१० धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनऊने हे लख्य १९.३ षटकात आणि ४ विकेट्सच्या नुकसानावर गाठले.
महत्वाच्या बातम्या –
धोनीने नेतृत्व सोडताच पलटले चेन्नईचे नशीब! आयपीएलमध्ये पहिल्यांदाच ओढावली ‘अशी’ नामुष्की
आझम आणि इमामपुढे फिके पडले ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज, धुव्वादार शतके करत विक्रमांचे रचले मनोरे
आयपीएलला मिस करतोय सॅम करन; म्हणाला, ‘मला आयपीएलमध्ये सहभागी व्हायचे होते, पण…’