आयपीएल २०२२ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून कुलदीप सेनच्या रूपात एका गुणवंत वेगवान गोलंदाजाने पदार्पण केले. रविवारी (१० एप्रिल) लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धचा सामना जिंकवण्यासाठी कुलदीप सेनचे प्रदर्शन महत्वपूर्ण राहिले. त्याने शेवटच्या षटकात मार्कस स्टोइनिससारख्या फलंदाजाला आवश्यक धावा करून दिल्या नाहीत आणि राजस्थानला हंगामातील तिसरा विजय मिळवून दिला. पदार्पणाचा सामना कुलदीपने अविस्मरणीय बनवला असला, तरी इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला आहे.
आयपीएल २०२२ च्या २० व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात लढत झाली. या सामन्यात कुलदीप सेन (Kuldeep Sen) याने टाकलेल्या शेवटच्या षटकामुळे राजस्थानने अवघ्या ३ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने ६ विकेट्सच्या नुकसानावर १६५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात लखनऊने ८ विकेट्सच्या नुकसानावर १६२ धावा केल्या. शेवटच्या षटकात लखनऊला विजयासाठी १५ धावा पाहिजे होत्या, पण कुलदीप सेनने असे होऊ दिले नाही.
मध्यप्रदेशच्या रीवा शहरातील कुलदीपच्या घरची परिस्थिती पाहिली, तर ती तशी गरीबच. त्याचे वडील केस कापण्याचे काम करतात. कुलदीप त्यांच्या घरातील सर्वात मोठा मुलगा होता. ते एकूण पाच भावंडे. दोन मोठ्या बाहिणी, तिसऱ्या क्रमांकाचा कुलदीप आणि नंतर दोन छोटे भाऊ. त्याने वयाच्या अवघ्या ८ व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. सुरुवातीला त्याला फलंदाजीची आवड होती, पण प्रशिक्षकांच्या सल्यामुळे तो वेगवान गोलंदाजीकडे वळला. तो ज्या अकादमीत सराव करायचा, त्याठिकाणी त्याच्याकडून फी देखी घेतली गेली नाही, जेणेकरून त्याला स्वतःचे स्वप्न पूर्ण करता येईल.
हेही वाचा– RR vs LSG : थरारक सामन्यात राजस्थानचा ३ धावांनी विजय; चहल, कुलदीप सेन विजयाचे हिरो
साल २०१८ मध्ये कुलदीपने मध्यप्रदेश संघाकडून पहिला प्रथम श्रेणी सामना खेळला. त्यानंतर याच संघाकडून त्याने देशांतर्गत टी-२० मध्ये पदार्पण केले. कारकिर्दीतील पहिल्या रणजी हंगामात त्याने तब्बल २५ विकेट्स नावावर केल्या होत्या. यादरम्यान पंजाबविरुद्धच्या एका सामन्यात त्याने ५ विकेट्स घेण्याची कामगिरी देखील केली होती. त्याने आतापर्यंत खेळलेल्या १६ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ४४ विकेट्स घेतल्या आहेत. लिस्ट ए मध्ये त्याच्या नावावर ४ आणि टी-२० मध्ये १३ विकेट्स आहेत.
देशांतर्गत क्रिकेटमधील त्याचे प्रदर्शन पाहून राजस्थान रॉयल्सने आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात त्याला २० लाख रुपयांमध्ये खरेदी केले. असे असले तरी, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा आणि नवदीप सैनी या दिग्गज गोलंदाजामध्ये त्याला संधी मिळण्याची शक्यता फार कमी होती. पण राजस्थान रॉयल्सने हंगामातील चौथ्या सामन्यात त्याला संधी दिली आणि कुलदीपने देखील या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. शेवटच्या षटकात त्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि राजस्थानला विजय मिळवून दिला.
M̶u̶s̶k̶u̶r̶a̶a̶i̶y̶e̶,̶ ̶a̶a̶p̶
Muskuraane, ki wajah tum ho 🎶 pic.twitter.com/xilu40PpzS
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 10, 2022
कुलदीप सेनने लखनऊविरुद्धच्या या सामन्यात टाकलेल्या ४ षटकांमध्ये ३५ धावा खर्च केल्या आणि १ विकेट घेतली. तो १४० पेक्षा अधिक ताशी वेगाने गोलंदाजी करू शकतो. त्याच्याकडे चेंडू स्वींग करण्याची गुणवत्ता आहे आणि सोबतच वेळप्रसंगी फलंदाजीतही महत्वाचे योगदान देऊ शकतो.
राजस्थान आणि लखनऊ (RR vs LSG) यांच्यातील या सामन्याचा विचार केला, तर लखनऊने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. राजस्थानकडून लखनऊला विजायसाठी १६६ धावांचे लक्ष्य मिळाले. लक्ष्याचा पाठलाग करताना अवघ्या ३ धावा कमी पडल्यामुळे लखनऊला पराभव पत्करावा लागला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
केकेआरला सपोर्ट करणारी ‘मिस्ट्री गर्ल’ निघाली अभिनेत्री, फोटोंवरुन हटणार नाही नजर!!
पृथ्वी शॉने केकेआरला धू धू धुतले; कर्णधार श्रेयस अय्यरही म्हणे, ‘त्यावेळी काय करावे समजत नव्हते’