इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये मुंबई इंडियन्स आतापर्यंत सर्वात खराब प्रदर्शन करणाऱ्या संघाच्या रूपात समोर आला आहे. संघाने त्यांचे सुरुवातीचे पाचही सामने गमावले आहेत आणि गुणतालिकेत संघ सर्वात खाली आहे. पुढचा सामना खेळण्यापूर्वी मुंबईचा महत्वाचा फलंदाज सूर्यकुमार यादवने पत्रकार परिषदेत दिलेल्या प्रतिक्रियेची जोरदार चर्चा होत आहे. सूर्यकुमार म्हणाला की, ‘मुंबई इंडियन्स अजूनही चॅम्पियन आहे आणि संघ नक्कीच पुनरागमन करेल.’
मुंबई इंडियन्सला चालू आयपीएल हंगामातील पुढचा सामना लखनऊ सुपर जायंट्ससोबत खेळायचा आहे, जो १६ एप्रिल रोजी मुंबईच्या ब्रेबॉर्न्स स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी सूर्यकुमार यादवने संघातील सकारात्मक गोष्टींवर नजर टाकली आहे. त्याने डेवाल्ड ब्रेविस आणि तिलक वर्मा या युवा खेळाडूंचे कौतुक केले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) म्हणाला की, “मला वाटते की, आम्ही काही प्रमाणात चांगले क्रिकेट खेळत आहोत. मागच्या काही वर्षांमध्ये आम्ही चांगल्या प्रोसेसचे पालन करत होतो. जर आम्ही कसून मेहनत घेतली, तर आम्ही पहिला विजय मिळवू.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
तिलक आणि ब्रेविसच्या प्रदर्शनाच्या कौतुकात सूर्यकुमार म्हणाला की, “खूप साऱ्या सकारात्मक गोष्टी झाल्या आहेत. तुम्ही डेवाल्डकडे पाहू शकता, तुम्ही तिलकला पाहू शकता, त्यांनी चांगले प्रदर्शन केले आहे. येणाऱ्या वर्षांमध्ये, आपण पाहू की, संघातून चॅम्पियन खेळाडू बाहेर पडतील. माझ्या आजूबाजूला प्रत्येक जण प्रेरित आहे. मी कोणाला प्रेरणा देण्याची गरज नाहीये. मुंबई इंडियन्ससाठी खेळणे खूप प्रेरणादायी आहे.”
"It is still a 𝙘𝙝𝙖𝙢𝙥𝙞𝙤𝙣 team and it'll always be a 𝙘𝙝𝙖𝙢𝙥𝙞𝙤𝙣 side." 💪
सूर्या दादा states some facts in the press conference ahead of #MIvLSG. 💙#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians @surya_14kumar MI TV pic.twitter.com/QIUzTJ1ABh
— Mumbai Indians (@mipaltan) April 15, 2022
दरम्यान, आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फ्रँचायझी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आयपीएल २०२२मध्ये (IPL 2022) खूपच निराशाजनक प्रदर्शन करत आहे. संघाने हंगामात आतापर्यंत एकही सामना जिंकला नाहीये. अशात संघाला प्लेऑफमध्ये जर स्थान मिळवायचे असेल, तर पुढचा प्रत्येक सामना जिंकण्याच्या दृष्टीने संघाला खेळावे लागणार आहे.
सूर्यकुमार दुखापतीमुळे हंगामातील पहिल्या काही सामन्यांमध्ये उपस्थित नव्हता, पण तरीही तो सध्या संघासाठी दुसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने ८१.५०च्या सरासरीने आणि १५८.२५च्या स्ट्राईक रेटने १६८ धावा केल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
SRH vs KKR: हैदराबादचा टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय, कोलकातामध्ये धुरंधर खेळाडूंची एन्ट्री
ऑस्ट्रेलियन दिग्गजाने मुंबई इंडियन्सच्या मर्मावर ठेवले बोट! म्हणाला, ‘इशान १५.२५ कोटींना पात्र नाही’