इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील २५वा सामना शुक्रवारी (दि. १५ एप्रिल) सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात पार पडणार आहे. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७.३० वाजता सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी ७ वाजता नाणेफेक झाली. यावेळी हैदराबाद संघाचा कर्णधार केन विलियम्सनने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. या हंगामात हैदराबाद संघ तिसरा विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल.
हैदराबाद संघात वॉशिंग्टन सुंदर खेळणार नाहीये. त्याच्या जागी जगदीश सुचिथची संघात एन्ट्री झाली आहे. दुसरीकडे कोलकाता संघात ऍरॉन फिंच आणि अमन खान यांची एन्ट्री झाली आहे. तसेच, शेल्डन जॅक्सनही या सामन्यात खेळणार आहे.
???? Team News ????
1⃣ change for @SunRisers as Jagadeesha Suchith is named in the team.
3⃣ changes for @KKRiders as Aaron Finch, Sheldon Jackson & Aman Khan are picked in the team.
Follow the match ▶️ https://t.co/HbO7UhlWeq#TATAIPL | #SRHvKKR
A look at the Playing XIs ???? pic.twitter.com/vDFIZT2wPD
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2022
आमने- सामने कामगिरी
सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात आतापर्यंत २१ सामने खेळले गेले आहेत. यामध्ये कोलकाताचे पारडे जड असल्याचे दिसते. कोलकाताने हैदराबादविरुद्ध १४ वेळा विजय मिळवला आहे. तसेच, हैदराबादने कोलकाताविरुद्ध ७वेळा विजय मिळवला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
या हंगामातील कामगिरी
हैदराबादने या हंगामात आतापर्यंत ४ सामने खेळले असून त्यात त्यांनी २ सामन्यात विजय आणि २ सामन्यात पराभव स्वीकारला आहे. तसेच, कोलकाताला आतापर्यंत खेळलेल्या ५ सामन्यांपैकी ३ सामन्यात विजय, तर २ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
सनरायझर्स हैदराबाद- अभिषेक शर्मा, केन विलियम्सन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), एडन मार्करम, शशांक सिंग, जगदीश सुचिथ, भुवनेश्वर कुमार, मार्को जेन्सेन, उमरान मलिक आणि टी नटराजन.
कोलकाता नाईट रायडर्स- ऍरॉन फिंच, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, आंद्रे रसेल, शेल्डन जॅक्सन (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, सुनील नारायण, उमेश यादव, अमन हकीम खान आणि वरुण चक्रवर्ती.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बटलरने भिरकावला गगनचुंबी षटकार, पण पुढच्याच चेंडूवर फर्ग्यूसनने असा काढला काटा; VIDEO VIRAL
Video: चक्क सुटाबुटात वसीम अक्रम उतरला स्विंमिंग पूलमध्ये! अनोख्या कृतीमागील कारणही केलंय स्पष्ट






