Monday, May 16, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Video: चक्क सुटाबुटात वसीम अक्रम उतरला स्विंमिंग पूलमध्ये! अनोख्या कृतीमागील कारणही केलंय स्पष्ट

Video: चक्क सुटाबुटात वसीम अक्रम उतरला स्विंमिंग पूलमध्ये! अनोख्या कृतीमागील कारणही केलंय स्पष्ट

April 15, 2022
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
Wasim-Akram

Photo Courtesy: Instagram/wasimakramliveofficial


पाकिस्तान संघाचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम नेहमी त्याच्या मजेशीर सोशल मीडिया पोस्टसाठी चर्चेत असतो. यावेळीही त्याच्या एका व्हिडिओची चर्चा चांगलीच रंगली आहे. अक्रमने यावेळी त्याला ट्रोल करणाऱ्यांची फिरकी घेतली आहे. या व्हिडिओत तो थ्री पीस सूटमध्ये असताना स्विमिंग पूलमध्ये उतरला असल्याचे दिसत आहे.

पाकिस्तानचा माजी दिग्गज वसीम अक्रम (Wasim Akram ) पॅंट आणि सूटसह स्विमिंग पूलमध्ये उतल्याचे पाहून चाहत्यांना आश्चर्य वाटले. अक्रम थ्री पीस सूटमध्ये स्विमिंगचा आनंद घेत असल्याचेही दिसत आहे. सुरुवातील चाहत्यांना हा नेमका काय प्रकार आहे, हे समजले नाही, पण पुढे स्वतः दिग्गजाने यामागचा खुलासा केला आहे.

ट्रोलर्सला उत्तर देण्यासाठी तो थ्री  पीसमध्ये पूलमध्ये उतरल्याचे अक्रमने  सांगितले. त्याने अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून शेअर केलेला हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओवर चाहत्यांसह दिग्गजांच्या लाईक्स आणि अनेक कमेंट्स येत आहेत.

वसीम अक्रमने व्हिडिओमध्ये त्याने केकेल्या या कृत्याचे  कारणही स्पष्ट केले आहे. अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून शेअर केलेल्या १९ मिनिटांच्या या व्हिडिओत तो म्हणाला, मला वाटते की, मागच्या वर्षी स्विमिंग करताना मी व्हिडिओ पोस्ट केला होता, पण काही मोठ्या लोकांनी मला ट्रोल करायला सुरुवात केली होती. लोक म्हणाले होते की, बिना शर्टची अंघोळ करताना लाज वाटत नाही का ? आता तुम्ही खुश आहात का ? मी थ्री पीस सूट घालून स्विमिंग करत आहे.

View this post on Instagram

A post shared by Wasim Akram (@wasimakramliveofficial)

अक्रमच्या या मजेशीर व्हिडिओवर भारताचा माजी फलंदा सुरेश रैनालाही हसू आवरले नाही. रैनाने अक्रमच्या पोस्टवर मजेदार कमेंटही केली आहे.अक्रमने या व्हिडिओला कॅक्शन देताना लिहिले की, “गरीबाची हाय आणि वेड्याची राय (सल्ला) कधीच घेतली नाही पाहिजे.” दरम्यान,  या मजेशीर व्हिडिओव्यतिरिक्त अक्रमच्या खात्यावर जाऊन पाहिले, तर खूप मेजशीर फोटो आणि व्हिडिओ पाहायला मिळतील. मागच्याच आठवड्यात त्याने त्याच्या पत्नीचा व्हिडिओ शेअर केला हात, ज्यामध्ये तो स्वतः गोलंदाजी करताना दिसलेला.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

कोलकाता-चेन्नईच्या ‘या’ खेळाडूंचा न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाकडून सन्मान, मिळाले मोठे पुरस्कार

Video: युझवेंद्र चहलने जोस बटलरची केली पायखेची; विचारले, ‘माझ्या फलंदाजीवर का जळतोय?’

GT vs RR | रस्सी वॅन डर ड्यूसेनचा कमाल थ्रो! थेट स्टम्पवर चेंडू फेकत वेडला धाडले माघारी, पाहा Video


ADVERTISEMENT
Next Post
Delhi-Capitals

मोठी बातमी! आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव, दिल्ली कॅपिटल्सचा महत्वाचा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

Kolkata-Knight-Riders-KKR

दोन वर्षांच्या बंदीनंतर IPLमध्ये कमबॅक केलेला केकेआरचा 'हा' गोलंदाज संपूर्ण हंगामातून बाहेर

Jasprit-Bumrah

"विराट-धोनीबद्दल सर्वजण चर्चा करतात, पण बुमराहनेही भारतासाठी अप्रतिम कामगिरी केली आहे"

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.