इंडियन प्रीमियर लीगचा ५ वेळा चॅम्पियन ठरलेला संघ म्हणजेच मुंबई इंडियन्स. संघासाठी आयपीएलच्या १५ व्या हंगामाची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्याच सामन्यात संघाला दिल्ली कॅपिटल्सने पराभूत केले. यानंतर मुंबई राजस्थान रॉयल्सविरुद्ध शनिवारी (२ एप्रिल) आपला दूसरा सामना खेळणार आहे. या सामन्यापुर्वी मुंबईच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर समोर आली आहे. संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव दूखापतीतून बरा होऊन संघासोबत जोडला गेला आहे.
सूर्यकुमार यादवला मागील महिन्यात वेस्टइंडिजविरुद्धच्या मायदेशातील मालिकेत दूखापत झाली होती. त्याला हाताच्या बोटांमध्ये जखम झाली होती, त्यानंतर तो बॅंगलोरच्या राष्ट्रीय अकादमीमध्ये दाखल झाला आणि आता तो दुखापतीतून संपुर्ण बरा झाला आहे. तसेच त्याने त्याचा क्वारंटाईन कालावधी देखील पूर्ण केला आहे, त्यामुळे तो राजस्थानविरुद्धच्या दूसऱ्या सामन्यात खेळताना दिसणार आहे.
मुंबई इंडियन्सने गुरुवारी (३१ मार्च) जारी केलेल्या निवेदनात लिहले आहे की, ‘सूर्यकुमार यादव आपला क्वारंटाइन कालावधी पुर्ण करुन संघात दाखल झाला आहे. तो कायरन पोलार्ड, जसप्रीत बुमराह आणि इशान किशनसोबत जिममध्ये देखील दाखल झाला आहे. सर्वांनी येथे फिटनेस आणि स्ट्रेंथच्या सत्रांमध्ये भाग घेतला आणि पुढील सामन्याची तयारी करत आहेत.’
𝐌𝐈 𝐃𝐚𝐢𝐥𝐲 मध्ये finally सूर्योदय झाला! ☀️😎#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians MI TV pic.twitter.com/QFg3yc6ks0
— Mumbai Indians (@mipaltan) March 31, 2022
Training day #1 of the new season for SKY ☀️#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians @surya_14kumar pic.twitter.com/6Ax6s7u1bH
— Mumbai Indians (@mipaltan) March 31, 2022
दिल्ली संघाने पहिल्या सामन्यात मुंबईला ४ विकेट्सने पराभूत केले आहे. पहिल्या सामन्यात मुंबईने १७८ धावांचे लक्ष्य दिल्ली संघासमोर ठेवले होते, जे दिल्लीने १८.२ षटकातच गाठले. यासह मुंबई संघ सलग १० वर्ष आपला पहिला आयपीएल सामना पराभूत झाला आहे. मुंबईने आजपर्यंतच्या आयपीएल इतिहासात ५ वेळा म्हणजेच २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये आयपीएल ट्राॅफी जिंकली आहे.
Banter toh hoga hi jab milenge puraane teen yaar 💙💙💙
Just reminding 😉#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians @jaspritbumrah93 @ninety9sl @surya_14kumar MI TV pic.twitter.com/8l9Ik2gQLE
— Mumbai Indians (@mipaltan) March 31, 2022
महत्त्वाच्या बातम्या-
किस्मत मेहरबान तो…! इंग्लंडच्या फलंदाजाला १-२ नव्हे चक्क ५ वेळा जीवनदान, सेमीफायनलमध्ये ठोकले शतक
विराट कोहलीचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मांचे प्रशिक्षकपद धोक्यात! कारणही तितकेच गंभीर
आता सुरू होईल खरी दंगल…! इंग्लंडचा ‘हा’ धडाकेबाज फलंदाज पंजाब किंग्जच्या ताफ्यात सामील