इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्सने चालू हंगामात आतापर्यंत ४ सामने खेळले आहेत आणि त्यापैकी २ सामन्यात विजय मिळवला आहे. अशात त्यांचा गोलंदाजी अष्टपैलू शार्दुल ठाकुरने चाहत्यांना विश्वास दिला आहे की, त्यांना चिंता करण्याची गरज नाहीये. कारण, संघ योग्य दिशेने पुढे चालला आहे.
भारतीय संघाचा ३० वर्षीय अष्टपैलू शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) आयपीएल २०२२मध्ये दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. चालू हंगामात खेळलेल्या ४ सामन्यात त्याने ३ विकेट्स घेतल्या आहेत आणि प्रत्येक सामन्यात प्रभाव पाडण्याचा प्रयत्न असल्याचेही सांगितले आहे. माध्यमांशी बोलताना शार्दुल म्हणाला की, “संघ योग्य दिशेने पुढे चालला आहे आमचे मुख्य प्रशिक्षक नेहमी आम्हाला नैसर्गिक खेळ खेळायला सांगत असतात, मग स्थिती अशीही असो. ते आमचे समर्थन करतात, त्यामुळे आम्ही नेहमी आमचे सर्वश्रेष्ट प्रदर्शन देण्याचा प्रयत्न करतो.”
टी२० क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडूंचे महत्त्व स्पष्ट करताना शार्दुल म्हणाल की, “आमचा फलंदाजी क्रम खूप मोठा आहे. टी२०मध्ये जेवढे जास्त अष्टपैलू असतील, कोणत्याही संघासाठी तेवढीच ती गोष्ट चांगली असते. जर आम्ही सुरुवातीला झटपट विकेट्स गमावल्या, तर ६, ७ आणि ८ क्रमांकावरील खेळाडूंची भूमिका महत्वाची असते.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
“संघातील वातावरण खूप चांगले आहे. संघात खूप सारे युवा खेळाडू आहेत आम्ही सर्वजण मित्र आहोत. कारण, आम्ही काही काळापासून एकत्र खेळत आहोत. मला माझ्या प्रत्येक सामन्यात प्रभाव पाडायला आवडते आणि त्यामुळेच मी खूप साऱ्या उर्जेसह खेळू इच्छितो,” असे शार्दुल पुढे बोलताना म्हणाला.
एका खेळाडूच्या रूपात त्याचे मुख्य उद्दिष्ट स्पष्ट करताना शार्दुल ठाकूर म्हणाला की, “मला क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे. मी इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळे मला कोणत्याही परिस्थितीत स्वतःला दबावात ठेवायचे नाहीये.”
दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सला त्यांचा पुढचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसोबत खेळायचा आहे, जो २७ मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबईच्या ताफ्यातील युवा खेळाडूंना बूम बूम बुमराहचा मोलाचा सल्ला; म्हणाला, ‘आता इतिहास विसरा…’
हरभजनचा ‘माही’वर घणाघात; “एकट्या धोनीने वर्ल्डकप जिंकवला, मग बाकीचे काय …. प्यायला गेले होते का”
‘धोनी ओपनिंग करून संघाला संकटातून काढू शकतो बाहेर’, माजी यष्टीरक्षक फलंदाजाचे मोठे विधान