---Advertisement---

उमरान मलिकच्या वडिलांना आहे विश्वास, लवकरच भारतीय संघासाठी खेळेल मुलगा; वाचा संपूर्ण वक्तव्य

Umran-Malik
---Advertisement---

जम्मू कश्मीरचा वेगवान गोंलंदाज उमरान मलिक भारतीय संघाचा भविष्यातील महत्वाचा गोलंदाज बनेल, असे अनेकांना वाटते. सनरायझर्स हैदराबादने त्याची गुणवत्ता लक्षात घेऊन आयपीएल २०२२ साठी त्याला संघात रिटेन केले आहे. चालू हंगामातील त्याचे प्रदर्शन अप्रतिम राहिले आहे. अशातच आता उमरानच्या वडिलांनी त्यांचा मुलगा भविष्यात राष्ट्रीय संघासाठी खेळेल आणि चांगली कामगिरी करून दाखवेल अशी भविष्यवाणी केली आहे.

आयपीएल २०२२ मधील सर्वात वेगवान चेंडू उमरान मलिक (Umran Malik) यानेच टाकला आहे आणि याच कारणास्तव अनेक जाणकारांनी तो लवकरच भारतीय संघासाठी खेळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.  त्याच्या वेगवान गोलंदाजीपुढे दिग्गज देखील नमले आहेत. सनरायझर्स हैदराबादचे प्रतिनिधित्व करताना त्याला अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत. त्याचे वडील राशिद मलिक (Rashid Malik) यांनादेखील असेच वाटते.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

एका वृत्तसंस्थेसोबत बोलताना उमरानचे वडील राशिद म्हणाले की, “आमच्या मुलाला खूप काही शिकायला मिळत आहे. आम्हाला वाटते की, भविष्यात त्याने अधिक मेहनत करावी आणि खूप काही शिकावे. आम्हाला अपेक्षा आहे की, तो येत्या काळात भारतासाठी खेळेल आणि चांगले प्रदर्शन करेल.”

दरम्यान, आयपीएल २०२२ मध्ये आतापर्यंत उमरानने खेळलेल्या ११ सामन्यांमध्ये १५ विकेट्स नावावर केल्या आहेत. यादरम्यान, गुजरात टायटन्सविरुद्धच्या एक सामन्यात त्याने पाच विकेट्स घेतल्या होत्या. या सामन्यात उमरानने चार षटके टाकली आणि त्यामध्ये २५ धावा खर्च करून ५ विकेट्स घेतल्या होत्या.

असे असले तरी, काही सामन्यांमध्ये उमरान संघासाठी महागात पडला आहे, हेदेखील तेवढेच खरे आहे. अनेक सामने असे गेले आहेत, ज्यामथ्ये उमरानने धावा खूप खर्च केल्या, पण विकेट मात्र घेऊ शकला नाहीये. मागच्या तीन सामन्यांमध्ये देखील त्याला एकही विकेट मिळालेली नाही. परंतु, तो स्वतःच्या प्रदर्शनात दिवसेंदिवस सुधारणा करताना दिसत आहे आणि लवकरच राष्ट्रीय संघासाठी पदार्पण करण्याच्या प्रयत्नात देखील आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

‘मलिक पाकिस्तानात असता, तर आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटही खेळले असते’, पाकिस्तानी क्रिकेटरचा खोचक टोला

“धोनी जर खेळणार नसेल, तर त्याने मेंटर किंवा कोच व्हावं”

जॉनी बेअरस्टोने डावाच्या दुसऱ्याच षटकात हेजलवूडला चोपले २ गगनचुंबी षटकार, पाहून विराटही झाला हँग

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---