आयपीएलच्या मैदानात शनिवारी (१४ मे) कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आमना सामना झाला. ही लढत दोन्ही संघांसाठी प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या दृष्टीने महत्वाची होती. कारण जो संघ पराभूत होईल तो प्लऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणार होता. हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक या सामन्यात पुन्हा एकदा चमकला. उमरानच्याच चेंडूवर खेळपट्टीवर सेट झालेल्या अजिंक्य राहणेने अनपेक्षितपणे विकेट गमावली.
उमरान मलिकने या सामन्यात टाकेलेल्या चार षटकांमध्ये ३३ धावा खर्च केल्या आणि ३ महत्वाच्या विकेट्स नावावर केल्या. केकेआरचा सलामीवीर वेंकटेश अय्यर अवघ्या ७ धावा करून बाद झाला, पण अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) मात्र नितीश राणासोबत काही काळ खेळू शकला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ४८ धावा जोडल्या. रहाणे चांगल्या लयीत दिसत होता, पण उमरानच्या चेंडूवर शशांक सिंगच्या हातून झेलबाद झाला. उमरानने त्याच्या पहिल्याच षटकात नितीश राणा आणि अजिंक्य रहाणे या जोडीला तंबूत धाडले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
केकेआरच्या डावातील ८ व्या षटकात उरमान मलिक (Umran Malik) गोलंदाजीसाठी आला होता. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर त्याने राणाला, तर शेवटच्या चेंडूवर रहाणेला झेलबाद केले. विशेष बाब म्हणजे दोघांनीही शशांक सिंग (Shashank Singh) याच्या हातात विकेट गमावली आहे. रहाणेचा झेल शशांकने ज्या पद्धतीने घेतला, ते पाहून प्रत्येक जण हैराण होता. त्यावेळी नॉन स्ट्राइकवर असलेल्या श्रेयस अय्यरला देखील यावर सुरुवातीला विश्वास बसला नव्हता. स्विपर कवरवर रहाणेने मोठा शॉट खेळला. समालोचन करणाऱ्या हरभजन सिंगला वाटले की हा षटकार आहे. पण हा षटकार नसून रहाणेने विकेट गमावली होती. रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत होते की, शशांकने उत्कृष्ट झेल पकडला होता.
Keeps his eyes on the ball ✅
Maintains his balance ✅
Completes a superb grab ✅Sit back & relive @shashank2191's outstanding catch near the ropes 🎥 🔽 #TATAIPL | #KKRvSRH | @SunRisers https://t.co/IX39wLlHLi
— IndianPremierLeague (@IPL) May 14, 2022
Super catch from Shashank Singh!! 🙌
#KKRvSRH | #SRHvsKKR | #IPL | #IPL2022 pic.twitter.com/K2J8bkuKvm#KKRvSRH
— Mayank Kashyap (@MayankK40232590) May 14, 2022
Shashank Singh 🔥🔥🔥#KKRvSRH pic.twitter.com/iGuTtHjdOW
— Awanish Pathak (@iAwanishPathak) May 14, 2022
Check out Shashank Singh takes a ripper of a catch on IPL 2021: https://t.co/PASQzA3IgI
— jasmeet (@jasmeet047) May 14, 2022
दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरुवात न मिळालेल्या केकेआरने निर्धारित २० षटकांमध्ये ६ विकेट्सच्या नुकसानावर १७७ धावा केल्या. यामध्ये त्यांचा अष्टपैलू आंद्रे रसेलने २८ चेंडूत सर्वाधिक ४९ धावा ठोकल्या आहेत. रहाणेने २८, तर राणाने २६ धावांचे महत्वाचे योगदान दिले. या दोघांनी डाव सावरल्यामुळेच केकेआरला ही धावसंख्या उभी करता आली. हैदराबादसाठी उमरानव्यतिरिक्त भुवनेश्वर कुमार, मार्को जेन्सन आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
आयपीएल मॅच फिक्सिंगच्या आरोपात सीबीआयकडून तिघांना अटक, पाकिस्तानशी आहे कनेक्शन!
निवृत्तीनंतर यूटर्न घेणारा रायुडू पहिलाच नव्हे, ‘या’ ५ क्रिकेटर्सनीही निर्णय बदलत केले होते पुनरागमन