---Advertisement---

ऋतुराजकडे नेतृत्त्वाचे सर्व गुण, धोनीनंतर तो बनू शकतो सीएसकेचा उत्तराधिकारी; पाहा कोणी केलंय हे भाष्य

On: शनिवार, मे 14, 2022 6:35 PM
---Advertisement---

आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात यशस्वी संघ चेन्नई सुपर किंग्ज चालू हंगामात पूर्णपणे अपयशी ठरताना दिसला आहे. एमएस धोनीने हा हंगाम सुरू होण्यापूर्वी सीएसकेचे कर्णधारपद सोडले होते, पण रविंद्र जडेजाला ही जबाबदारी पेलता आली नाही आणि धोनी पुन्हा कर्णधार बनला. अशात आता भारताचा माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवागने सीएसकेच्या भविष्यातील कर्णधाराविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

एमएस धोनी (Ms Dhoni) चालू हंगामात जरी सीएसकेचे नेतृत्व करत असला, तरी तो पुढच्या हंगामात ही जबबादारी पार पाडेल, याची खूपच कमी शक्यता आहे. कदाचीत धोनीचा हा शेवटचा आयपीएल हंगाम असू शकतो. अशात विरेंद्र सेहवाग (Virendra sehwag) याला असे वाटत आहे की, धोनीनंतर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) सीएसकेचे नेतृत्व योग्य पद्धतीने करू शकतो.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

एका वृत्तसंस्थेशी बोलताना सेहवाग म्हणाला की, “तो (ऋतुराज) महाराष्ट्राचा कर्णधार आहे. तो खूप शांत राहून खेळतो. जर त्याने शतक केले तरीही शांत राहतो आणि शून्यावर बाद झाला, तरीही शांत राहतो. हे त्याच्या चेहऱ्यावरून कळत नाही की, शतक केल्यानंतर तो आनंदी आहे आणि शून्यावर बाद झाल्यानंतर तो दुःखी आहे.”

पुढे बोलताना तो म्हणाला की, “त्याचे स्वतःवर नियंत्रण आहे, तो शांत आहे. त्याच्याकडे एक चांगला कर्णधार बनण्यासाठी आवश्यक असणारे सर्व गुण आहेत. तो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये नेतृत्व करत आहे, त्यामुळे त्याला सामना पार पाडता येतो. कोणाला चेंडू दिला जाणार आहे, फलंदाजी क्रमात काय बदल करणे गरजेचे आहेत, त्याला सर्व माहीत आहे.”

सेहवागच्या मते ऋतुराजकडे नेतृत्वाचे सर्व गुण आहेत, पण त्याच्या धोनीप्रमाणे नशीबाची साथ असेल याची खात्री देता येणार नाही. “तीन-चार हंगाम खेळल्यानंतर तो एक असा कर्णधार बनेल, जो एमएस धोनीनंतर मोठ्या काळासाठी नेतृत्व करू शकतो. जग धोनीला एक चांगला कर्णधार मानते, कारण तो शांत आहे. स्वतःचे निर्णय घेतो, गोलंदाज आणि फलंदाजांचा योग्य उपयोग करन घेतो. त्याच्याकडे नशीब आहे. नशीब त्यांच्यासोबत असते, जे शूर असतात आणि एमएस धोनी एक शूर कर्णधार आहे. त्याच्याकडे धोनीचे सर्व गुण आहेत, फक्त एक सोडून. त्याच्या नशिबाविषयी मला खात्री नाहीये.” असे सेहवाग पुढे बोलताना म्हणाला.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

धोनीच्या कथित गर्लफ्रेंडचा मोठा खुलासा; म्हणाली, ‘मी अनेक रिलेशनशिपमधून गेलीये’

आय ऍम जोकिंग! काही मिनिटांतच निवृत्तीच्या निर्णयावरून रायुडूचा यूटर्न, नेटकऱ्यांनी केले भलतेच ट्रोल

‘मलिक पाकिस्तानात असता, तर आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटही खेळले असते’, पाकिस्तानी क्रिकेटरचा खोचक टोला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---