आयपीएल २०२२ हंगामात नव्याने सहभागी झालेल्या गुजरात टायटन्सने आतापर्यंत उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे आणि गुणतालिकेत त्यांचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. २ मे रोजी गुजरात राज्याची स्थापना करण्याता आली होती आणि हा दिवस गुजरात स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. गुजरात टायटन्सने देखील हा दिवस साजरा केला. यादरम्यान राशिद खान आणि हार्दिक पंड्याचा मुलगा अगस्त्य एकत्र डान्स करताना दिसले. राशिदने शेअर केलेला व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
गुजरात स्थापना दिवसाच्या निमित्ताने गुजरात टायटन्सचे सर्व खेळाडू आणि त्यांचे कुटुंबीय पारंपारिक कपड्यांमध्ये दिसले. गुजरात संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) देखील त्याच्या कुटुंबासोबत या कार्यक्रमात सहभागी झाला होता. या खास दिवसाच्या आनंदात अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खान (Rashid Khan) देखील सहभागी झाला. राशिद खान हार्दिक पंड्याचा मुलगा अगस्त्य पंड्या (Agastya Pandya) सोबत एका गुजराती गाण्यावर डान्स करताना दिसला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
राशिद खान आयपीएल २०२२मध्ये गुजरात टायटन्सच्या उपकर्णधारची भूमिका पार पाडत आहे. बॉलिवूडचा चित्रपट ‘लवयात्रा’मधील एका गुजरातील गाण्यावर राशिदने डान्स केला, यावेळी त्याने अगस्त्यला उचलून घेतल्याचे दिसले. हार्दिक पंड्या आणि त्यांची पत्नी नताशा या दोघांनी राशिद आणि अगस्त्यच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच, हार्दिकने कुटुंबासोबतचे फोटोही शेअर केले आहेत.
https://www.instagram.com/reel/CdDdsYlo-co/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, आयपीएल २०२२ मध्ये गुजरात टायटन्सने आतापर्यंत केलेल्या प्रदर्शनावर नजर टाकली, तर ते खूपच उत्कृष्ट राहिले आहे. गुजरात टायटन्सने आयपीएलमध्ये आतापर्यंचे सर्वोत्तम संघ चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सला, तर धूळ चारलीच, पण इतर संघांवर देखील मात केली. चालू हंगामात आतापर्यंत खेळलेल्या ९ सामन्यांपैकी ८ सामने संघाने जिंकले आहेत आणि फक्त एका सामन्यात पराभव स्वीकारला आहे. गुणतालिकेत त्यांचा संघ १६ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. अशात गुजरातने जर अजून एक सामना जिंकला, तर प्लेऑफमध्ये त्यांचे स्थान पक्के होईल.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
श्रेयस अय्यरच्या विकेटवरून झाली कॉमेडी, पंचांनी दिला भलताच निर्णय; मग पडले तोंडघशी
‘तीन सामन्यातच धुमाकूळ घातला’, केकेआरचा कर्णधार श्रेयसने ‘या’ खेळाडूला म्हटले फ्यूचर स्टार
गलती से मिस्टेक! ट्रेंट बोल्टच्या पायाला लागला प्रसिद्ध कृष्णाचा तेजतर्रार थ्रो, धापकन पडला खाली