रविवारी (०३ एप्रिल) झालेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यात युवा वेगवान गोलंदाज वैभव अरोरा चर्चेचा विषय ठरला. पंजाब किंग्जने या सामन्यात ५४ धावांनी विजय मिळवला असून वैभवने यामध्ये मोलाचे योगदान दिले. त्याने पावर प्लेमध्ये सीएसकेच्या दोन महत्वाच्या विकेट्स घेऊन पदार्पण सामन्यात स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली. आयपीएलमध्ये मोठा अनुभवी असलेला गोलंदाज संदीप शर्माच्या जागी वैभवला संधी दिली गेली होती.
वैभव अरोरा (Vaibhav Arora) १४ डिसेंबर १९९७ रोजी जन्मला होता आणि सध्या त्याचे वय २४ वर्ष आहे. पंजाब किंग्ज आणि सीएसके (PBKS vs CSK) यांच्यातील सामन्यातून त्याला आयपीएल पदार्पणाची संधी मिळाली. या सामन्यात वैभवने सीएसकेच्या रॉबिन उथप्पा आणि मोईन अली या दोन महत्वाच्या फलंदाजांना पावर प्लेमध्ये तंबूत पाठवले होते. सुरुवातीला मिळालेल्या या दोन झटक्यांतून सीएसके शेवटपर्यंत सावरू शकली नाही आणि शेवटी पराभव पत्करला. त्याने टाकेलल्या ४ षटकांमध्ये २१ धावा खर्च करून २ विकेट्स घेतल्या.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो सुरुवातीला हिमाचल प्रदेशसाठी खेळला. त्यानंतर २०१९ मध्ये सौराष्ट्रकडून प्रथम श्रेणी पदार्पण केले. मागच्या वर्षी त्याने छत्तीगड संघाकडून टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पंजाब किंग्जने त्याला २०२० मध्ये नेट गोलंदाजाच्या रूपात संघात सामील केले होते. यापूर्वी तो कोलकाता नाइट रायडर्सचा भाग होता, पण त्यांच्याकडून त्याला आयपीएल पदार्पणाची संधी मिळाली नव्हती.
आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात पंजाब किंग्ज आणि केकेआरमध्ये वैभवला खरेदी करण्यासाठी स्पर्धा पाहायला मिळाली. पण पंजाब किंग्जने अखेर २ कोटी रुपये खर्च करून त्याला संघात सामील केले. त्याच्या कारकिर्दीचा एकंदरीत विचार केला, तर त्याने आतापर्यंत १३ टी-२० सामन्यांमध्ये १४ विकेट्स नावावर केल्या आहेत. त्याचे सर्वोत्तम प्रदर्शन १६ धावा खर्च करून ३ विकेट्स घेण्याचे आहे. ८ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याने ३० विकेट्स घेतल्या आहेत.
सीएसकेविरुद्ध आयपीएल पदार्पण करून वैभव जरी चर्चेत आला असला, तरी एक वेळ अशी आली होती, जेव्हा त्याने क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला होता. आर्थिक तंगीमुळे तो क्रिकेटला रामराम ठोकणार होता, पण त्याचे प्रशिक्षक रवी वर्मा त्याचे मन वळवण्यात त्यावेळी यशस्वी ठरले होते.
महत्वाच्या बातम्या –
नाणेफेकीचा कौल हैदराबादच्या पारड्यात, लखनऊच्या ताफ्यात धाकड अष्टपैलूचे पुनरागमन; पाहा प्लेइंग XI
पंत जिथे, इंटरटेनमेंट तिथे! टॉसवेळी दिल्लीच्या कर्णधाराकडून झाली अशी काही चूक की सर्वत्र पिकला हशा
क्या बात! आपल्याच गोलंदाजीवर झेल घेण्यासाठी लिविंगस्टोन हवेत झेपावला, फलंदाजही बघतच राहिला