चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज संघात सोमवारी (२५ एप्रिल) आयपीएल २०२२मधील ३८वा सामना खेळला गेला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात पंजाबने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात जबरदस्त प्रदर्शन केले. पंजाबचा सलामीवीर शिखर धवन याचा हा २००वा आयपीएल सामना होता. या खास सामन्यात जबरदस्त प्रदर्शन करत त्याने सर्वांची वाहवाह लुटली. धवनव्यतिरिक्त अजून एक खेळाडू सामना दर्शकांचे आकर्षण ठरला, तो म्हणजे रिशी धवन.
आयपीएल २०२२मध्ये पंजाबने पहिल्यांदाच मैदानावर उतरवलेला वेगवान गोलंदाज धवन (Rishi Dhawan) या सामन्यात फेस प्रोटेक्शन (फेस शिल्ड, Face Protection) घालून आला होता. यामुळे त्याने दर्शकांचे लक्ष वेधले आहे.
Rishi Dhawan, apparently with a face protection! #CSKvsPBKS pic.twitter.com/MAoauehfXw
— Rural Maxwell (@gbenhur) April 25, 2022
Rishi Dhawan playing his first IPL match in 6 years. pic.twitter.com/TSpWe4lv2r
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 25, 2022
३२ वर्षीय धवन तब्बल ६ वर्षांनंतर म्हणजे २०१६ नंतर पहिल्यांदाच आयपीएलच्या (IPL 2022) रणांगणात उतरला होता. त्याला पंजाबकडून डावातील पाचवे षटक टाकण्यासाठी पाठवले गेले आणि तो सर्वांच्या नजरेत आला. त्याने गोलंदाजी करताना त्याच्या चेहऱ्याला चेंडू लागू नये म्हणून ढालीप्रमाणे फेस प्रोटेक्शन घालते होते. दुरून मोठ्या चष्म्याप्रमाणे भासणारे फेस प्रोटेक्शन घालून कोणत्या गोलंदाजाने आयपीएलमध्ये खेळण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी. याचमुळे तो सामना दर्शकांच्या आकर्षणाचा विषय ठरला.
What's more dangerous than a lion? 𝘼 𝙝𝙪𝙣𝙜𝙧𝙮 𝙡𝙞𝙤𝙣. #SherSquad, tune in to this video to find out the reason behind @rishid100's initial absence & how he is all set for a roaring comeback now 👊#SaddaPunjab #PunjabKings #IPL2022 #ਸਾਡਾਪੰਜਾਬ #RishiDhawan pic.twitter.com/mnKKULSSrz
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 24, 2022
रिशी धवनने फेस प्रोटेक्शन घालण्यामागचे कारण
धवनने चेन्नईविरुद्ध फेस प्रोटेक्शन घालून मैदानावर उतरण्यामागे मोठे कारण होते. धवन आयपीएल सुरू होण्यापूर्वी रणजी ट्रॉफीमध्ये खेळला आणि या रणजी ट्रॉफीतील दुसऱ्या फेरीच्या सामन्यांमध्ये त्याच्या चेहऱ्यावर चेंडू लागल्याने नाकावर मार लागला होता. यामुळे त्याला स्कॅनसाठी रुग्णालयातही नेण्यात आले होते. त्याच कारणास्तव, तो पंजाबसाठी पहिल्या चार सामन्यांमध्ये खेळण्यास अनुपलब्ध होता.
धवनच्या नाकावर जखम झाल्यानंतर त्याच्या नाकावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. म्हणूनच तो खबरदारी म्हणून चेन्नईविरुद्ध फेस प्रोटेक्शन घालून उतरला असल्याचे समजते.
तब्बल ६ वर्षांनंतर आयपीएल पुनरागमन
धवनने २०१६ साली पंजाबकडूनच रायझिंग पुणे सुपरजायंट्सविरुद्ध शेवटचा आयपीएल सामना खेळला होता. त्यानंतर त्याला आयपीएल खेळण्याची पुरेशी संधी मिळाली नव्हती. मात्र चेन्नईविरुद्ध त्याने आयपीएलमध्ये पुनरागमन केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भर मैदानात कृणालचं पोलार्डवरील प्रेम गेलं उत्तू, घेतलं मुंबईकराच्या डोक्याचं चुंबन; पाहा Video
पंधरा कोटी पाण्यात घालणाऱ्या इशानविरुद्ध मुंबई इंडियन्स घेणार ‘ऍक्शन’! प्रशिक्षकांकडून संकेत
सामना एक, रेकॉर्ड अनेक! सीएसकेविरुद्ध शिखर धवनचा ‘गब्बर’ पराक्रम, रचले विक्रमांचे मनोरे