---Advertisement---

‘मिशन आयपीएल’ फत्ते केल्यानंतर आता हार्दिकचे आहे ‘हे’ लक्ष्य, देशासाठी करायचंय मोठ्ठ काम

On: सोमवार, मे 30, 2022 6:54 PM
Hardik-Pandya
---Advertisement---

भारताचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या याने आयपीएल २०२२ मध्ये आपले नेतृत्त्व कौशल्य दाखवून दिले आहे. प्रथमच कर्णधार म्हणून आयपीएलच्या रणांगणात उतरलेल्या हार्दिकने गुजरात टायटन्स संघाला आयपीएलचा विजेता बनवले आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्ध अंतिम सामन्यात गुजरातने ७ विकेट्स राखून विजय मिळवत चषक जिंकला आहे. विशेष म्हणजे, गुजरातचा हा पदार्पणाचा आयपीएल हंगाम होता. यानंतर आता गुजरातचा कर्णधार हार्दिकने त्याचे भविष्यातील लक्ष्य सांगितले आहे.

आयपीएल ट्रॉफी (IPL 2022 Winner) जिंकल्यानंतर भारतीय संघाला (Team India) विश्वचषक जिंकून देण्याचे (World Cup) आपले स्वप्न असल्याचे हार्दिकने सांगितले आहे. भारतीय संघ यावर्षी ऑक्टोबरमध्ये टी२० विश्वचषक खेळणार आहे.

आयपीएल २०२२मधील अंतिम सामन्यानंतर बोलताना हार्दिक (Hardik Pandya) म्हणाला की, “निश्चितच मला भारतीय संघासाठी विश्वचषक जिंकायचा आहे. काहीही होवो, मला भारताला पुन्हा एकदा विश्वविजेता बनवायचे आहे. यासाठी मी स्वतला झोकून देईल. मी नेहमी असा व्यक्ती राहिलो आहे, जो स्वत:पेक्षा संघाला (Hardik Pandya Future Goal) पुढे ठेवतो. माझे लक्ष्य खूप सोपे आहे, मी माझ्या संघाला अधिकाधिक परिणाम मिळवून देऊ शकेल.” 

https://youtu.be/pFSxsS2szd0

भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व करणे म्हणजे स्वप्न खरे होण्यासारखे
२०१७ चँपियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध भारताकडून हार्दिकने चिवट झुंज दिली होती. मात्र तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला होता. तसेच २०१९ विश्वचषकातही तो भारतीय संघाचा सदस्य होता, ज्यामध्ये भारतीय संघाने उपांत्य सामन्यापर्यंतचा प्रवास केला होता. भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व करणे सन्मानाची गोष्ट असल्याचे हार्दिकने म्हटले आहे.

हार्दिक म्हणाला की, “भारताकडून खेळणे म्हणजे स्वप्न सत्यात उतरल्यासारखे वाटते. मी भारतीय संघाकडून किती सामने खेळलेत किती नाहीत, याने कसलाही फरत पडत नाही. देशाचे प्रतिनिधित्त्व करणे ही नेहमीच सन्मानाची गोष्ट असते. मला ज्याप्रकारचे प्रेम आणि समर्थन मिळाले आहे, त्यासाठी मी सर्वांना आभारी आहे. माझी मोठी इच्छा आहे की, मी भारतीय संघाला विश्वचषक जिंकून द्यावा.”

महास्पोर्ट्सचा वॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

काय आहे गुजरातच्या यशाचं गमक? उपकर्णधार राशिद खानने उलघडले गुपीत

अश्विन महान क्रिकेटर, पण गोलंदाजीत ‘या’ सुधारणेही आहे गरज; कुमार संगकाराचा कडवा सल्ला

धोनीच्या ‘त्या’ विक्रमाची ११ वर्षांनंतर गिलकडून पुनरावृत्ती

IPLमध्ये करोडोंची बोली लागल्यानंतर खरंच तेवढे पैसे Cricketersच्या खात्यात जमा होतात का?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---