अहमदाबाद| गुजरात टायटन्स संघाने पदार्पणातच इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) चषकावर आपले नाव कोरले. या धमाकेदार प्रदर्शनाने त्यांचे चाहते भलतेच खूष झाले आहेत. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरात संघाने पहिल्याच सामन्यात लखनऊसुपर जायंट्सला ५ विकेट्सने पराभूत करत आयपीएल २०२२च्या प्रवासाला उत्तम सुरूवात केली होती. पुढे आपला विजयरथ सुसाट ठेवत त्यांनी अंतिम सामन्यात धडक मारली.
पंधराव्या आयपीएलच्या अंतिम सामन्याचा थरार नरेंद्र मोदी स्टेडीयमवर रविवारी (२९ मे) रंगला. या सामन्यात गुजरातने (Gujarat Titans) राजस्थान रॉयल्सचा ७ विकेट्सने पराभव केला. यावेळी राजस्थानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा त्यांचा निर्णय चांगलाच अंगलट आल्याचा दिसून आला. त्यांनी २० षटकात ९ विकेट्स गमावत १३० धावा केल्या. याच्या प्रत्यूत्तरात गुजरात संघाने ३ विकेट्स गमावत १८.१ षटकातच लक्ष्य पूर्ण केले.
संघाच्या या यशाने खूष झालेल्या खेळाडूंनी रविवारीच (२९ मे) हॉटेलवर जल्लोष केला. नंतर सोमवारी (३० मे) रो़ड शो मार्फत संघाच्या आनंदात चाहत्यांना सामील केले. हा शो करण्यासाठी गुजरात संघाच्या व्यवस्थापन संघाने पोलिसांची परवानगी घेतली होती. सुरक्षेचा सगळा बंदोबस्त झाल्यावरच हा शो करण्यात आला.
गुजरातचा हा रोड शो संध्याकाळी (३० मे) साडेपाच वाजता उस्मानपुरा रिवरफ्रंट ते विश्वकुंज रिवरफ्रंट येथे करण्यात आला. काही विदेशी खेळाडू हे त्यांच्या मायदेशी परतल्याने या शोमध्ये बहुतेककरून भारतातीलच खेळाडू दिसले.
Kal ki yeh yaadgar shaam, aap ke pyaar aur support ke naam 🥰😁
Jald lautenge, tab tak khayal rakhna Amdavad 💙#SeasonOfFirsts #AavaDe pic.twitter.com/IMgH0izYAL
— Gujarat Titans (@gujarat_titans) May 31, 2022
गुजरातने आयपीएल २०२२चे १४ पैकी १० साखळी सामने जिंकत गुणतालिकेत पहिले स्थान गाठले होते. नंतर त्यांनी पहिल्या क्वालिफायर सामन्यात राजस्थानचा ७ विकेट्सने पराभव करत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला होता. तर अंतिम सामन्यातही पुन्हा एकदा राजस्थानला धूळ चारत विजेतेपदावर नाव कोरले.
या हंगामात गुजरातने सांघिक कामगिरी केली आहे. पंड्याने महत्वाच्या सामन्यांत अष्टपैलू खेळी करत संघाला विजय मिळवून दिला आहे. त्याने शेवटच्या सामन्यात ३४ धावा केल्या आणि ३ विकेट्सही मिळवल्या. यावेळी त्याने राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन, सलामीवीर (ऑरेंज कॅप धारक) जोस बटलर आणि शिमरॉन हेटमायर या तीन प्रमुख विकेट्स घेत संघाची फलंदाजी खिळखिळी केली. यामध्ये शुबमन गिलने नाबाद ४५ धावा आणि डेविड मिलरने झटपट नाबाद ३२ धावा करत संघाचा विजय निश्चित केला.
त्याचबरोबर हार्दिक सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने १५ सामन्यात ४४.२७च्या सरासरीने ४८७ धावा केल्या आहेत. तर गोलंदाजीत गुजरात संघाच्या मोहमद शमीने २० आणि उपकर्णधार राशिद खानने १९ विकेट्स घेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सहावे आणि आठवे स्थान गाठले.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ओहो! गुजरात आयपीएलचा चँपियन बनल्यानंतर ट्रॉफी घेऊन झोपले ‘नेहरा कुटुंबीय’, Photo चर्चेत
बड्डे स्पेशल: अनसोल्ड खेळाडू ते मॅच विनर, आरसीबीच्या रजत पाटीदारची प्रेरणादायी कहानी
दु:खद! इंग्लंडच्या माजी यष्टीरक्षकाचे निधन, क्रिकेट कारकिर्दीत केल्या होत्या ४० हजार धावा