---Advertisement---

वेगवेगळ्या संघांकडून खेळत असले तरीही बॉन्डिंग तीच! चहल आणि मॅक्सवेलच्या भेटीचे फोटो व्हायरल

On: मंगळवार, एप्रिल 5, 2022 5:22 PM
Yuzvendra-Chahal-Glenn-Maxwell
---Advertisement---

आयपीएल २०२२ मध्ये मंगळवारी (०५ एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्स संघात लढत रंगणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. उभय संघांची ही या हंगामातील पहिलीच लढत असेल. हे दोन्ही संघ सध्या शानदार लयीत आहेत, त्यामुळे हा सामना रोमांचक होण्याची आशा आहे.

या सामन्याच्या एक दिवसापूर्वी राजस्थान आणि बेंगलोर (RR vs RCB) संघाचे खेळाडू सराव सत्रासाठी मैदानावर एकत्र जमले होते. यादरम्यान दोन्ही संघातील खेळाडूंनी एकमेकांची भेट घेतली. यंदा राजस्थानकडून खेळत असलेल्या युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) नेही त्याचा चांगला मित्र असलेल्या ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) ची भेट घेतली आहे. त्यांच्या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल (Chahal & Maxwell Meet) होत आहेत. 

चहल आणि मॅक्सवेलमध्ये चांगली मैत्री आहे. ते दोघे यापूर्वी बेंगलोर संघाकडून एकत्र खेळले आहेत. आयपीएल २०२२च्या मेगा लिलावात बेंगलोरने मॅक्सवेलला रिटेन केले होते. तर त्यांना चहलला रिलीज करावे लागले होते. मेगा लिलावात राजस्थान संघाने चहलला ६.५ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. यानंतर आता तो प्रथमच बेंगलोरविरुद्ध आपला पहिला आयपीएल सामना खेळेल.

या सामन्यापूर्वी सराव सत्रात चहल आणि मॅक्सवेलची भेट झाली. इतक्या दिवसांनी एकमेकांना भेटल्यानंतर मॅक्सवेलने आनंदाने चहलला मिठी मारली. त्यानंतर त्याच्या डोक्यावर हात ठेवला. तसेच हे दोघे पुढे एकमेकांच्या गळ्यात हात टाकून बोलतानाही दिसले. 

बेंगलोर संघाने त्यांच्या मुलाखतीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांनी फोटो शेअर करत काही नाते नेहमीच खास राहतात, असे कॅप्शन दिले आहे. तसेच राजस्थान संघानेही त्यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

आमने- सामने कामगिरी
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्स (Royal Challengers Bangalore And Rajasthan Royals) संघ आतापर्यंत २५ वेळा आमने-सामने आले आहेत. त्यातील १२ सामने बेंगलोर संघाने, तर १० सामने राजस्थानने जिंकले आहेत. उभय संघातील ३ सामने अनिर्णित राहिले आहेत. मागील २ हंगामांपासून राजस्थान संघाला बेंगलोर संघावर विजय मिळवता आलेला नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

आवेशने विकेट्सचा चौकार ‘तिला’ केला समर्पित; म्हणाला, ‘ती हॉस्पिटलमधूनही मला प्रेरणा देत होती’

हैदराबादच्या कर्णधाराला बाद करण्यासाठी आवेश खानने बनवली होती अशी योजना, स्वत: केला खुलासा

अर्रर्र! आरसीबीसाठी ट्रेनिंग सुरू करूनही मॅक्सवेल खेळणार नाही आजचा सामना; पण कधी उतरणार मैदानात?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---