आयपीएल मेगा लिलावात (IPL mega auction) भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल (yuzvendra chahal) याला राजस्थान रॉयल्सने ६.५ कोटी रुपायंमध्ये खरेदी केले. चहल नेहमीच त्याच्या मजेशीर स्वभावासाठी चर्चेत राहिला आहे. यापूर्वी आयपीएल फ्रेंचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी खेळतानाही तो अनेकदा सहकाऱ्यांसोबत मजा मस्करी करताना दिसला आहे. आता चहल राजस्थान रॉयल्समध्ये सहभागी झाला आहे, पण त्याचा मजेशीर स्वभाव मात्र तसाच राहणार आहे. राजस्थानने त्याला विकत घेताच चहलने त्याचे रंग दाखवायला सुरूवात केली आहे.
त्याचे झाले असे की, मेगा लिलावात जे खेळाडू अनसोल्ड राहिले, त्यांची नावे लिलावाच्या शेवटी पुन्हा एकदा घेतली गेली. अनसोल्ड खेळाडूंची यादी सुरू होण्यापूर्वी राजस्थान रॉयल्सने स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून एक खास पोस्ट केली. पोस्टमध्ये लिहिले गेले होते की, “काहीच तास राहिले आहेत, अनसोल्ड खेळाडूंच्या यादीविषयी तुमचा काही सल्ला आहे का?”
राजस्थान रॉयल्सच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून केल्या गेलेल्या या पोस्टवर चहलने एक गमतीशीर कमेंट केली आहे. या कमेंटच्या माध्यमातून चहलने राजस्थान रॉयल्स पेजच्या ऍडमिनची एकप्रकारे फिरकी घेतली आहे. कमेंटमध्ये त्याने लिहिले की, “तुम्ही स्वतःच एवढं बोलता, तर आम्हाला कुठे बोलू देणार आहात.” चहलच्या या कमेंटवर चाहत्यांकडूनही लाइक्स आणि रिप्लाय येत आहेत. एकंदरित पाहता चहलने घेतलेली ही फिरकी चाहत्यांनाही आवडली आहे.
https://www.instagram.com/p/CZ6112kscUC/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, मेगा लिलावात राजस्थान रॉयल्सने चहलव्यतिरिक्त दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनलाही खरेदी केले. चहलसाठी संघाने ६.५ कोटी, तर अश्विनसाठी ५ कोटी रुपये खर्च केले आहेत. युवा खेळाडू प्रसिद्ध कृष्णा राजस्थान रॉयल्सला सर्वात महागात पडला. कृष्णासाठी संघाने १० कोटी रुपये खर्च केले. तत्पूर्वी संघाने कर्णधार संजू सॅमसनला रिटेन करण्यासाठी १४ कोटी, तर जोस बटलरला रिटेन करण्यासाठी १० कोटी खर्च केले होते.
आयपीएल २०२२ साठी राजस्थान रॉयल्सचा पूर्ण संघ –
देवदत्त पडिक्कल, यशस्वी जायसवाल, संजू सॅमसन, जोस बटलर, शिमरोन हेटमायर, रेयान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा, केसी करियप्पा, नवदीप सैनी, तेजस बरोका, अनुय सिंह, कुलदीप सेन, ध्रुव जुरेल , कुलदीप यादव, शुभम गरवाल, नाथन कूल्टर नाइल, रासी वॅन डर ड्यूसेन, जेम्स नीशम, डेरिल मिशेल, करुण नायर, ओबेद मॅककॉय
महत्वाच्या बातम्या –
चौथ्या सांघिक आंतर क्लब टेनिस स्पर्धेत टायगर्स, लायन्स, एफसी जीएनआर संघांची आगेकूच
‘तो चांगेल प्रदर्शन करेल, पण…’, पंतने सलामीला फलंदाजी करण्याबद्दल प्रशिक्षकांची मोठी प्रतिक्रिया
आगामी आयपीएलसाठी सनरायझर्सचा मोठा ‘गेमप्लॅन’! ‘हा’ अष्टपैलू उतरणार सलामीला