बुधवारी (३० मार्च) मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर राॅयल्स चॅंलेजर्स बॅंगलोर (आरसीबी) आणि कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) या दोन संघांमध्ये आयपीएलचा ६ वा सामना पार पडला. हा सामना आरसीबीने ७ विकेट्सने जिंकला. या सामन्यात केकेआरचा धडाकेबाज फलंदाज आंद्रे रसलने १८ चेंडूत २५ धावा करत महत्त्वपुर्ण खेळी खेळली, यामध्ये तीन षटकारांचा देखील समावेश आहे. त्याच्या एका षटकाराचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.
केकेआरच्या डावात आरसीबीचा शाहबाज अहमद (shahbaz ahmad) फलंदाजी करत असताना १३ व्या षटकाच्या दूसऱ्या चेंडूवर रेसलने १ पाऊल देखील पुढे न येता गुडघ्यावर बसत आपल्या ताकतीने मोठा षटकार लगावला. आंद्रे रसलचा हा षटकार साधा षटकार नव्हता, तो माॅन्स्टर षटकार होता, जो सीमारेषेपासून खुप दूर जाऊन आदळला. आंद्रे रसलच्या या षटकारावर तंबूत बसलेले खेळाडू देखील स्वत:ला रोखू शकले नाहीत. त्यांनी त्याच्या षटकारावर टाळ्या वाजवल्या.
https://twitter.com/srkian_abhijeet/status/1509187288806625281?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1509187288806625281%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketnmore.com%2Fcricket-news%2Frcb-vs-kkr-andre-russell-monster-six-against-shahbaz-ahmed-96726
फाफ डु प्लेसीसच्या नेतृत्वाखाली आरसीबीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करताना केकेआर संघाला १२८ धावांवरच रोखले. आंद्रे रसलने सर्वाधिक २५ धावा केल्या. आरसीबीकडून हसरंगाने ४ विकेट्स घेतल्या आणि आकाश दीपने ३ विकेट्स घेतल्या. आरसीबीनेकडून फाफ डू प्लेसीसने ५ तर विराट कोहलीने १२ धावा केल्या. रुदरफोर्डने २८ आणि अहमदने २७ धावा केल्या. दिनेश कार्तिकने शेवटच्या षटकात पहिल्या चेंडूवर षटकार आणि दूसऱ्या चेंडूवर चौकार मारत संघाला विजय मिळवून दिला. त्याने ७ चेंडूत १४ धावा केल्या. केकेआर संघात शिवम मावीच्या जागी टिम साउदीला स्थान देण्यात आले होते, तर आरसीबी संघ मागील सामन्यातील प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरला होता.
आरसीबीचा हा पहिलाच विजय आहे. पंजाबविरुद्धच्या पहिल्या सामन्यात संघाला अपयश आले होते, तर केकेआरने आपल्या पहिल्या सामन्यात सीएसकेवर विजय मिळवला होता. केकेआर आपला तिसरा सामना पंजाबविरुद्ध १ एप्रिलला खेळणार आहे. तर आरसीबी ५ एप्रिलला आपला तिसरा सामना राजस्थानविरुद्ध खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कर्णधार डू प्लेसिसने कार्तिकला म्हटले धोनीसारखे ‘कूल’, उधळली स्तुतीसुमने; वाचा स्टेटमेंट
केकेआरविरुद्ध थरारक विजय मिळवूनही आरसीबीचा कर्णधार नाराज, ‘या’ गोष्टीचं वाटतंय वाईट
रहाणेच्या मोठ्या विक्रमावर सिराजने फेरले पाणी; धोनी, विराटच्या क्लबमध्ये सामील होण्याची होती संधी