पाच वेळा आयपीएल स्पर्धेचा किताब पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाला आयपीएल 2023 हंगामातील तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. हंगामातील 31व्या सामन्यात पंजाब किंग्स संघाने मुंबईला 13 धावांनी नमवले. या पराभवानंतर भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. चोप्राने सांगितले आहे की, सामन्याला कलाटणी देणारा क्षण कोणता होता. चला जाणून घेऊयात…
आकाश चोप्रा (Aakash Chopra) याने सांगितले की, अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याच्या 31 धावाच्या षटकानंतर संपूर्ण सामना पालटला. इथूनच मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ पिछाडीवर पडला.
काय म्हणाला आकाश चोप्रा?
आकाश चोप्रा म्हणाला की, अर्जुन तेंडुलकर याच्या त्या षटकामुळे संपूर्ण सामना पंजाबच्या बाजूने सरकला. चोप्राने त्याच्या युट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटले की, “आधी 10 षटकात 85 धावाही झाल्या नव्हत्या. त्यानंतर सर्वांनाच वाटले होते की, पंजाब संघ 160 धावाही करणार नाही. मात्र, त्यांनी 214 धावा केल्या. अर्जुन तेंडुलकर याच्या त्या षटकात 31 धावा गेल्या. त्यामुळे तिथूनच सामना पालटला.”
𝟔, 𝐖𝐝, 𝟒, 𝟏, 𝟒, 𝟔, 𝐍𝟒, 𝟒 – 31 runs off the 16th over! 💥👊🏻#SherSquad, how's the Jazba? 🤩#MIvPBKS #JazbaHaiPunjabi #SaddaPunjab #TATAIPL pic.twitter.com/ea1Kvc5YvE
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 22, 2023
खरं तर, 15व्या षटकानंतर पंजाब किंग्स संघाने 4 विकेट्स गमावत 118 धावा केल्या होत्या. त्यानंतर अर्जुन गोलंदाजीसाठी आला. त्याने या षटकात 31 धावा खर्च केल्या. यानंतर पंजाब संघाच्या फलंदाजांनी लय पकडत 214 धावा चोपल्या. शेवटच्या 5 षटकात पंजाबने जवळपास 100 धावा केल्या. त्यामुळे याच धावा मुंबईला शेवटी महागात पडल्या.
31 runs off that over! 🔥#MIvPBKS pic.twitter.com/Yve5h9ky8r
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 22, 2023
या सामन्यात पंजाब किंग्सने मुंबईला 13 धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने निर्धारित 20 षटकात 8 विकेट्स गमावत 214 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई संघाला 6 विकेट्स गमावत 201 धावाच करता आल्या. त्यामुळे अर्शदीप सिंग याच्या शेवटच्या षटकातील जबरदस्त गोलंदाजीमुळे मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. अर्शदीपने अखेरच्या षटकात पहिल्या चेंडूवर 1 आणि शेवटच्या चेंडूवर 1 अशा फक्त 2 धावा खर्च केल्या. त्याव्यतिरिक्त त्याने दुसरा आणि पाचवा चेंडू निर्धाव टाकला. तसेच, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर सलग दोन चेंडू टाकत स्टंप मोडून टाकला. (ipl 2023 arjun tendulkar s 31 run over shift the momentum towards punjab kings says this former cricketer)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दोन स्टंप मोडत मुंबईला वानखेडेत लोळवल्यानंतर अर्शदीपचा मोठा खुलासा; म्हणाला, ‘माझ्या हृदयाची धडधड…’
‘कारवाई तर होणारच…’, अर्शदीपने स्टंप तोडल्यावर पंजाब किंग्जच्या ट्विटवर मुंबई पोलिसांचे भन्नाट उत्तर