---Advertisement---

प्रथमच विदेशात सजणार आयपीएल खेळाडूंची मंडी? ‘या’ शहराचे नाव आघाडीवर; लवकरच होणार अधिकृत घोषणा

On: बुधवार, ऑक्टोबर 26, 2022 9:09 PM
IPL Auction
---Advertisement---

सध्या क्रिकेटजगतात टी20 विश्वचषकाचे वारे वाहत आहेत. सुरुवातीपासूनच विश्वचषकातील सामने रोमांचक होताना दिसतायेत. त्यानंतर पुन्हा एकदा इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील हंगामाची चर्चा सुरू होताना दिसेल. याची सुरुवात आयपीएलच्या ट्रेडिंग विंडोने झाली आहे. अद्याप कोणत्याही संघाने खेळाडू बदली केले नसले तरीही, लवकरच पुढील हंगामासाठी पहिला ट्रेड येऊ शकतो. तत्पूर्वी, पुढील आयपीएल हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव कोठे होणार याबाबत एक माहिती समोर येतेय.

कोणत्याही आयपीएल हंगामाच्या काही महिने आधी खेळाडूंचा लिलाव आयोजित केला जातो. 2022 मध्ये खेळाडूंचा मेगा लिलाव पार पडला होता. त्यामुळे पुढील वर्षीचा लिलाव हा मोजक्याच खेळाडूंचा होईल. हा लिलाव तुर्कीची राजधानी असलेल्या इस्तंबूल पार पडला जाऊ शकतो. आतापर्यंत आयपीएलचे सर्व लिलाव हे भारतातच पार पडले आहेत. इस्तंबूलसह बेंगलोर, हैदराबाद, नवी दिल्ली व मुंबई ही शहरे देखील लिलावाच्या यजमानपदाच्या शर्यतीत आहेत.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत म्हटले की, “याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. परंतु आम्ही इस्तंबूलचा गांभीर्याने विचार करत आहोत. कोविड महामारीच्या सुरुवातीपासून आम्ही संघ आणि त्यांच्या अधिकार्‍यांना सामान्य वातावरणात भेटलो नाही. यावेळी आम्ही सर्व गोष्टी पूर्ववत करू इच्छितो. मात्र, सर्व संबंधितांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल.”
या संपूर्ण प्रकरणाचा अंतिम निर्णय आयपीएलचे नवे गव्हर्नर अरुण धूमल यांच्या अध्यक्षतेखालील होणाऱ्या आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत घेतला जाईल.

मिळत असलेल्या माहितीनुसार, आयपीएल लिलाव 16 डिसेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. या हंगामासाठी सर्व संघांना आपल्या खेळाडूंची अंतिम यादी सादर करण्याची मुदत 15 नोव्हेंबर देण्यात आलीये.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इतिहास कायम राहिला! विश्वचषकात आयर्लंडविरुद्ध इंग्लंड नेहमीच होते टाय-टाय फिस्स
टी20 क्रमवारीत पहिल्या स्थानाकडे विराटची आगेकूच, सूर्या-बाबरला मागे टाकत नवा खेळाडू दुसऱ्या क्रमांकावर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---