---Advertisement---

मुंबईविरुद्धच्या सामन्यात आरसीबीवर संकट! पहिल्या सामन्याला मुकणार ‘एवढे’ खेळाडू

Faf-Du-Plessis-And-Glenn-Maxwell
---Advertisement---

शुक्रवारपासून (दि. 31 मार्च) इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेपूर्वी अनेक महत्त्वाचे खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याच्या बातम्या येत आहेत, ज्यामुळे संघांची चिंता वाढली आहे. अशातच आता विराट कोहली याचा संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघालाही झटका बसला आहे. खरं तर, या दोन खेळाडूंमुळे संघावरील दबाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चला तर कोण आहेत ते दोन गोलंदाज जाणून घेऊयात…

खरं तर, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाचे दोन धुरंधर ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आणि जोश हेजलवूड (Josh Jazlewood) पहिल्या सामन्याला अनुपस्थित राहणार आहेत.

अर्ध्या हंगामाला मुकण्याची शक्यता
माध्यमांतील वृत्तांनुसार, हेजलवूड टी20 स्पर्धेच्या नंतरच्या टप्प्यात खेळण्याची शक्यता आहे. असे म्हटले जात आहे की, तो सध्या दुखापतींचा सामना करत आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, हेजलवूड आयपीएलमध्ये भाग घेण्याचा निर्णयापूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वैद्यकीय पथकाकडून सल्ला घेईल. जर असे घडले, तर तो अर्ध्या हंगामाला मुकण्याची शक्यता आहे.

पहिला सामना खेळू शकणार नाही मॅक्सवेल
दुसरीकडे, ग्लेन मॅक्सवेल याच्याबाबत बोलायचं झालं, तर तो आरसीबीच्या पहिल्या सामन्यात खेळण्याची शक्यता खूपच कमी आहे. नुकतेच, त्याने अपघातानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. तसेच, यानंतर तो भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात खेळला, पण त्यानंतर तो सातत्याने सामन्यांना मुकला होता. असे म्हटले जात आहे की, पायाच्या दुखापतीतून तो अजून पूर्णपणे सावरला नाहीये.

मुंबईविरुद्ध होणार पहिला सामना
आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेच्या हंगामाला 31 मार्चपासून सुरुवात होणार आहे. तसेच, स्पर्धेचा शेवटचा साखळी सामना 21 मे रोजी खेळला जाईल. पहिला सामना 31 मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये गतविजेत्या गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात खेळला जाणार आहे. दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात 2 एप्रिल रोजी सामना खेळला जाईल. या स्पर्धेचा अंतिम सामना 28 मे रोजी खेळला जाईल. (ipl 2023 bowler josh hazlewood glenn maxwell in doubt for royal challengers vs mumbai indians match)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
काय सांगता! सचिनचा लेक गाजवणार आयपीएल 2023? स्वतः रोहित म्हणाला…
IPLपूर्वी मुंबईच्या नवीन हेड कोचची विरोधी संघांना चेतावणी; म्हणाला, ‘मी काय इथे तिसऱ्या अन् चौथ्या…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---