अर्जुन तेंडुलकर मागच्या दोन वर्षांपासून मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. पण अजून त्याला आयपीएल पदार्पणाची संधी मिळाली नाहीये. आयपीएल 2023 मध्येही मुंबई इंडियन्सने अर्जुनला संघात घेतले आहे आणि यावेळी त्याच्या पदार्पणाविषयी चाहत्यांना प्रश्न पडले आहेत. आगामी आयपीएल हंगाम सुरू होण्यापूर्वी मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी माध्यमांशी चर्चा केली.
आयपीएल 2021 आणि 2022 मध्ये अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये होता. पण दोन्ही हंगामांमध्ये त्याला बेंचवर बसवले गेले. आयपीएल 2023 (IPL 2023) पूर्वीही अर्जुन नेट्समध्ये सराव करत आहे. त्याच्या आयपीएल पदार्पणाविषयी रोहित शर्मा (Rohit Sharma) याला प्रत्रकारांनी प्रश्न विचारला. रोहितने या प्रश्नावर दिलेल्या उत्तरानंतर अर्जुनच्या पदार्पणाची शक्यात दाट असल्याचे संकेत मिळाले. रोहित म्हणाला, “चांगला प्रश्न आहे. आशा आहे.”
यावेळी रोहितसोबत मुंबईचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर देखील उपस्थित होते. अर्जुच्या पदार्पणाविषयी बाउचर म्हणाले, “अर्जुनने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर अनेकांना प्रभावित केले आहे. जर तो तयार असेल तर, नक्कीच संघ निवड करताना त्याचे नाव विचारात घेतले जाईल.” यावेळी अशीही माहिती मिळाली की, अर्जुनला दुखापत झाली होती आणि सध्या तो यातून सावरत आहे.
“अर्जून अजून दुखापतीतून बरा होत आहे. तो आज रात्री सराव करणार आहे. मागच्या 6 महिन्यांपासून चांगला खेळला आहे. खासकरून गोलंदाजीमध्ये त्याने चमक दाखवली. त्यामुळे अर्जुनचे नाव आम्ही संघ निवडताना विचारत घेऊ शकतो. आमच्यासाठी ही बाब फायद्याचीच असेल,” असे बाउचर पुढे म्हणाले.
रोहित मुंबईचा नियमित कर्णधार आहे, पण यावर्षी आयपीएलच्या काही सामन्यांमध्ये त्याला विश्रांती मिळू शकते. यावर बाउचर म्हणाले, “भारताला वर्षाच्या शेवटची विश्वचषक खेळायचा आहे. रोहितला विश्रांती द्यायचे आझेच, तर कोणत्याही परिस्थितीत फॉर्ममध्ये येणारच आहे. पण संघाला आशा आहे की, तो विश्रांती घेणार नाही. आम्ही परिस्थितीत पाहून योग्य निर्णय घेऊ.” माध्यमांतील वृत्तांनुसार रोहितने जर काही सामन्यांमधून वर्कलोडचे कारण देत माघार घेतली, तर सूर्यकुमार यादव संघाचे नेतृत्व करू शकतो.
(Rohit Sharma hints at Arjun Tendulkar’s IPL debut.)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीज मध्ये पुणे पलानी टास्कर्सची विजयी सलामी
विराटने घेतली 2 सार्वकालीन महान खेळाडूंची नावे; एक सचिन, पण दुसरा कोण? घ्या जाणून