इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत सर्वात खराब कामगिरी करणारा संघ म्हणजे दिल्ली कॅपिटल्स होय. दिल्ली संघ हंगामातून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला होता. संघाकडे चांगले खेळाडू असूनही त्यांना स्पर्धेत पुनरागमन करता आले नाही. अशात भारतीय संघाचा माजी सलामीवीर आणि समालोचक आकाश चोप्रा याने दिल्ली संघाविरुद्ध अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तो म्हणाला आहे की, दिल्ली संघ चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या अक्षर पटेल याचा योग्यप्रकारे वापर करू शकला नाही. चोप्रानुसार, जर हाच अक्षर पटेल, एमएस धोनी याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स संघात असता, तर कदाचित तो हंगामातील सर्वोत्तम खेळाडू ठरला असता.
दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघासाठी आयपीएल 2023 (IPL 2023) हंगाम चांगला ठरला नाही. संघाने अधिकतर सामने गमावले आणि गुणतालिकेतील नवव्या स्थानावर समाधान मानले. मात्र, अक्षर पटेल (Axar Patel) याने जबरदस्त प्रदर्शन केले. त्याने चेंडू आणि बॅट दोन्ही विभागात आपले महत्त्वाचे योगदान दिले.
अनेकदा असे वाटत होते की, दिल्ली संघ कदाचित अक्षरचा पूर्णपणे फायदा उचलू शकला नाही. कारण, त्याला कमी संधी मिळाल्या. आकाश चोप्रा (Aakash Chopra) याच्यानुसार, अक्षरचा चांगल्याप्रकारे वापर केला गेला नाही.
‘धोनीच्या संघात असता, तर अक्षर पटेल आयपीएल 2023चा सर्वोत्तम खेळाडू असता’
जिओ सिनेमावर बोलताना अक्षर पटेल याच्याविषयी बोलताना आकाश चोप्रा याने मोठे भाष्य केले. तो म्हणाला की, “पहिला खेळाडू जो माझ्या डोक्यात येतो, ज्याने जबरदस्त प्रदर्शन केले, तो सर्वात मौल्यवान खेळाडूंच्या यादीत असायला पाहिजे होता. कल्पना करा जर हा खेळाडू एमएस धोनी याच्या संघात असता, तर कदाचित स्पर्धेतील सर्वोत्मत खेळाडू असता आणि तो अक्षर पटेल आहे. त्याला फलंदाजीची जास्त संधीच मिळत नव्हती.”
पुढे बोलताना तो म्हणाला की, “तुम्हाला आश्चर्य वाटेल की, हे निर्णय कोण घेत होते. तुमच्याकडे कर्णधाराच्या रूपात डेविड वॉर्नर आहे. याव्यतिरिक्त डगआऊटमध्ये रिकी पाँटिंग, सौरव गांगुली, शेन वॉटसन, जेम्स होप्स, अजित आगरकर आणि प्रवीण आमरे यांसारखे दिग्गज आहेत. इतका मोठा थिंक टॅक असूनही तुम्ही तुमच्या सर्वोत्तम खेळाडूकडून कशाप्रकारे त्याचे सर्वोत्तम काढून घ्यायचे याचा मार्ग शोधू शकला नाहीत.”
अक्षर पटेलची कामगिरी
अक्षर पटेल याच्या आयपीएल 2023 हंगामातील कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर त्याने 14 सामन्यात फलंदाजी करताना 28.30च्या सरासरीने 283 धावा केल्या. यामध्ये 1 अर्धशतकाचाही समावेश होता. याव्यतिरिक्त त्याने 14 सामन्यात गोलंदाजी करताना 7.19च्या इकॉनॉमी रेटने 11 विकेट्स घेतल्या. (ipl 2023 commentator aakash chopra slams delhi capitals for not utilising axar patel)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘त्या’ एका फोनमुळे हुकलं होतं सेहवागचं पदार्पण, नाहीतर शारजाहमध्ये आलं असतं वादळ
दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गजानेही ओळखली हार्दिक पंड्याची ताकद; म्हणाला, ‘तो जगातील सर्वोत्तम…’