जगभरात क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक देशाकडे दिग्गज खेळाडू आहेत. या खेळाडूंनी आपल्या तडाखेबंद फटकेबाजीने आणि शानदार गोलंदाजीने जागतिक क्रिकेटमध्ये धुमाकूळ घातला. मात्र, या सर्वांमधून विराट कोहली याने सार्वकालीन खेळाडू म्हणून फक्त दोन दिग्गजांची निवड केली. आयपीएल 2023 स्पर्धेपूर्वी विराट कोहली याने जगातील दोन सार्वकालीन खेळाडूंबाबत सांगितले आहे. त्याने भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडिजचे दिग्गज विवियन रिचर्ड्स यांचे नाव घेतले. विराटच्या मते, या दोन खेळाडूंनी क्रिकेटला पूर्णपणे बदलले.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाने शेअर केलेल्या व्हिडिओत विराट कोहली (Virat Kohli) याने याबाबत भाष्य केले. विराट म्हणाला की, “मी नेहमीच दोन नावे घेतली आहेत. सचिन तेंडुलकर आणि सर विव रिचर्ड्स. सचिन माझा हिरो आहे. या दोघांनीही त्यांच्या पिढीमध्ये फलंदाजीत क्रांती घडवली आणि क्रिकेटला पूर्णपणे बदलले. त्यामुळे मला वाटते की, ते दोघे सर्वोत्तम फलंदाज आहेत.”
सचिन आणि रिचर्ड्स यांची आकडेवारी
सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि विवियन रिचर्ड्स (Vivian Richards) यांचे आकडे विराटचे वक्तव्य खरे ठरवतात. सचिनने 664 आंतरराष्ट्रीय सामन्यात 48.52च्या सरासरीने 34,357 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 100 शतके आणि 164 अर्धशतके ठोकली आहेत. त्याची यादरम्यानची सर्वोत्तम धावसंख्या ही 248 इतकी आहे. त्याच्या खात्यात क्रिकेटचे अनेक विक्रम आहेत. यामध्ये कसोटी आणि वनडे धावांचा समावेश आहे. सचिनने 201 आंतरराष्ट्रीय विकेट्सही नावावर केल्या आहेत.
दुसरीकडे विवियन रिचर्ड्स यांच्याबाबत बोलायचं झालं, तर ते त्यांच्या काळातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक होते. त्यांनी 1975 आणि 1979 विश्वचषक जिंकणाऱ्या वेस्ट इंडिज संघाचे प्रतिनिधित्वही केले होते. त्यांनी 121 कसोटी सामन्यात 50.23च्या सरासरीने 8540 धावा केल्या. यामध्ये 24 शतके आणि 45 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच, 187 वनडे सामने खेळताना त्यांनी 47च्या सरासरीने 6721 धावा केल्या आहेत. यामध्ये 11 शतके आणि 45 अर्धशतकांचा समावेश आहे.
आयपीएल 2023मधील पहिला सामना
तसं पाहिलं तर आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेची सुरुवात 31 मार्चपासून होत आहे. मात्र, आरसीबीचा स्पर्धेतील पहिला सामना 2 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळला जाणार आहे. (ipl 2023 cricketer virat kohli told sachin tendulkar and vivian richards greatest players of all time)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
यापूर्वी खेळलेल्या गुजरात-चेन्नईमधील 2 सामन्यात कोण कुणावर भारी? वाचून तुम्हालाही बसणार नाही विश्वास
रिकव्हर होत असलेल्या पंतबाबत मोठी बातमी! IPL 2023 सुरू होण्यापूर्वीच म्हणाला, ‘मी खेळायला येतोय…’