---Advertisement---

पिक्चर अभी बाकी है! एमएस धोनीच्या IPL निवृत्तीवर रोहितचे मोठे विधान, ‘माही’प्रेमींनी वाचाच

On: बुधवार, मार्च 29, 2023 1:02 PM
MS-Dhoni-And-Rohit-Sharma
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याने 2020 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र, तो इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत खेळत राहिला. आता आयपीएल 16 हंगाम हा धोनीचा अखेरचा हंगाम असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. असे म्हटले जात आहे की, आयपीएल 2023 स्पर्धेनंतर चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार एमएस धोनी निवृत्ती होईल. मात्र, मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने वेगळे मत मांडले आहे. रोहितने दिलेल्या उत्तराने धोनीच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाल्याशिवाय राहणार नाही. तो म्हणाला की, ‘पिक्चर अजून बाकी आहे.’

आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच रोहित शर्मा (Rohit Sharma) याने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने म्हटले की, “एमएस धोनी हा अजूनही इतका फिट आहे की, 2-3 हंगाम खेळू शकतो. मला वाटत नाही की, हा त्याचा शेवटचा हंगाम असेल.”

https://twitter.com/mipaltan/status/1640939833026842624?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1640939833026842624%7Ctwgr%5Ea4ee306a90e385b17cdeb446de14ac570a30b3fb%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.indiatv.in%2Fsports%2Fcricket%2Frohit-sharma-feels-ms-dhoni-can-play-till-ipl-2025-mumbai-indian-pc-jasprit-bumrah-update-2023-03-29-946463

धोनीच्या जबरदस्त फटकेबाजीने चाहते फिदा
चाहत्यांमध्ये माही, धोनी आणि महेंद्र बाहुबली यांसारख्या नावांमुळे प्रसिद्ध असलेल्या धोनीचा फिटनेस पाहून चाहतेही त्याच्यावर फिदा झाले आहेत. धोनीचे जे फोटो समोर येत आहेत, त्यावरूनही हेच स्पष्ट होते. फोटोंमध्ये स्पष्ट दिसत होते की, धोनीचे बायसेप्स मोठे होते आणि तो त्याच्या अंदाजात जबरदस्त फटकेबाजी करत होता. यावर इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन यानेही धोनीची प्रशंसा केली. दुसरीकडे, धोनी नेहमीप्रमाणे शांत बसला आहे. फक्त त्यालाच माहिती आहे की, निवृत्ती कधी घ्यायचीये आणि कधीपर्यंत खेळायचे आहे. विशेष म्हणजे, धोनी सध्या 41 वर्षांचा असूनही खूपच फिट आहे. तसेच, मैदानातही तो नेहमीच्या चपळतेने धावताना दिसत आहे.

सीएसके 4 वेळा चॅम्पियन
एमएस धोनी (MS Dhoni) याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाने 4 वेळा आयपीएलचे किताब जिंकले आहे. सीएसके (CSK) संघ सर्वाधिक आयपीएल किताब जिंकण्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानी आहे. पहिल्या स्थानी रोहितच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आहे. जर धोनीने या हंगामाचा किताब जिंकला, तर तो रोहितच्या संघाची बरोबरी करेल. (ipl 2023 csk captain ms dhoni is fit enough to play for 2 3 more years says rohit sharma)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
SA vs WI: तिसऱ्या टी20त फलंदाजांची कमाल, 40 ओव्हरमध्ये चोपल्या 433 धावा; मालिका विंडीजच्या नावे
भारतातील दिग्गज क्रिकेट प्रशिक्षकाला सेक्स स्कँडलमध्ये अटक, क्लिप व्हायरल होताच आत्महत्येचा प्रयत्न

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---