महेंद्र सिंग धोनी याच्या नेतृत्वातील चार वेळचा आयपीएल चॅम्पियन बनलेला चेन्नई सुपर किंग्स संघ आयपीएल 2023 स्पर्धेत चमकदार कामगिरी करत आहे. सीएसकेने मंगळवारी (दि. 23 मे) पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्स संघाला 15 धावांनी पराभूत करत अंतिम सामन्याचे तिकीट खिशात घातले. या विजयानंतर चेन्नई सुपर किंग्स संघाचे खेळाडू एकच जल्लोष करताना दिसले. विशेष म्हणजे, ड्वेन ब्रावोने लिफ्टमध्ये डान्स केला. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गुजरातला 15 धावांनी पराभूत करताच चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला. हॉटेलच्या लिफ्टमध्ये संघाचे खेळाडू तुफान नाचले. यादरम्यान सर्वाधिक जोशात सीएसके (CSK) संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक ड्वेन ब्रावो (Dwayne Bravo) दिसला. ब्रावोने तुषार देशपांडे आणि इतर खेळाडूंसोबत जोरदार डान्स केला. यापूर्वी जेव्हा अखेरच्या क्षणात दीपक चाहर याने गुजरातचा खेळाडू मोहम्मद शमी याचा झेल घेतला होता, तेव्हाही डीजे ब्रावो (DJ Bravo) सीमारेषेच्या बाहेर जल्लोष करताना दिसला होता.
Dwayne Bravo and CSK's players dances in a lift after qualifier 1 confirmation for in this IPL!#ChennaiSuperKings #CSKvsDCpic.twitter.com/UC0EHremB3
— Chamkila (@chamkila_0) May 20, 2023
चेन्नई 10व्यांदा दिमाखात आयपीएलच्या अंतिम सामन्यात
एमएस धोनी (MS Dhoni) याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स संघ 10व्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवण्यात यशस्वी झाला. धोनीने 2010, 2011, 2018 आणि 2021 हंगामात चेन्नईला ट्रॉफी जिंकून दिली. संघ सर्वाधिक 10 वेळा अंतिम सामन्यात पोहोचला आहे. सीएसकेने 2008, 2012, 2013, 2015 आणि 2019 हंगामातही अंतिम सामना खेळला होता. मात्र, त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. मागील हंगामातही सीएसकेचे प्रदर्शन खूपच खराब होते. त्यांना 9व्या स्थानी समाधान मानावे लागले होते. मात्र, आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत त्यांनी उच्च दर्जाचा खेळ दाखवत अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले.
The celebrations begin in the @ChennaiIPL camp as they get one step close to a victorious season 🙌#CSK register a 15-run win in #Qualifier1 over #GT 👏🏻👏🏻
Scorecard ▶️ https://t.co/LRYaj7cLY9#TATAIPL | #Qualifier1 | #GTvCSK pic.twitter.com/WaGTRKNdXH
— IndianPremierLeague (@IPL) May 23, 2023
सामन्याचा आढावा
चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना ऋतुराज गायकवाड (60) आणि डेवॉन कॉनवे (40) यांच्या जोरावर 20 षटकात 7 विकेट्स गमावत 172 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरात संघाने शुबमन गिल (42) आणि राशिद खान (30) यांच्या जोरावर फक्त 157 धावाच केल्या. त्यामुळे गुजरातला 15 धावांनी पराभूत व्हावे लागले. विशेष म्हणजे, गुजरातने आयपीएलमध्ये पहिल्यांदाच कोणत्याही सामन्यात सर्व विकेट्स गमावल्या. यापूर्वी त्यांनी एकदाही दहा विकेट्स गमावल्या नव्हत्या. या सामन्यातील कामगिरीसाठी ऋतुराजला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यता आले. (ipl 2023 csk celebration after reaching final dwayne bravo danced in the lift see video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20त घडला इतिहास! भारतीय मूळ असलेल्या ‘या’ धुरंधराने 49 चेंडूत ठोकल्या 144 धावा, टोटल होती 324
Eliminator मॅचपूर्वी भज्जीने ठोकला दावा; म्हणाला, Mumbai Indians साठी ‘हा’ पठ्ठ्या ठरणार ट्रम्प कार्ड