---Advertisement---

Video : वडील धोनीने षटकार मारताच झिवाने वाजवली शिट्टी, तर पत्नी साक्षीनेही केला आनंद साजरा

On: बुधवार, मे 10, 2023 10:48 PM
MS-Dhoni-And-Ziva-Dhoni
---Advertisement---

चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर आयपीएल 2023च्या 55व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स संघ आमने-सामने होते. बुधवारी (दि. 10 मे) या सामन्यात नाणेफेक जिंकत सीएसकेचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी याने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय सीएसकेच्या फलंदाजांनी प्राथमिकरीत्या योग्य ठरवत संघाची धावसंख्या दीडशेच्या पार नेली. यामध्ये एमएस धोनी याचेही मोलाचे योगदान होते. आठव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या धोनीने 2 षटकार खेचले. यावेळी धोनीने षटकार मारताच स्टेडिअममध्ये बसलेल्या लेक झिवा धोनी शिट्टी वाजवताना दिसली. आता यादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत.

झाले असे की, या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघ प्रथम फलंदाजीला उतरला होता. यावेळी सीएसके (CSK) संघाने निर्धारित 20 षटकात 8 विकेट्स गमावत 167 धावांचा डोंगर उभारला. या धावांमध्ये एमएस धोनी याच्या 20 धावांचे योगदान होते. या धावा धोनीने 9 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने केल्या होत्या.

https://twitter.com/ChennaiIPL/status/1656330236894773248?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1656330236894773248%7Ctwgr%5E1147517581edd636ec48412969f9092449613b85%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news24online.com%2Fsports%2Fcricket%2Fipl-2023-csk-vs-dc-ms-dhoni-daughter-ziva-cheers-her-father-see-video-brmp%2F232552%2F

या सामन्यात धोनी 8व्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्याने अखेरच्या दोन षटकात शानदार फटकेबाजी करत सर्वांचे लक्ष वेधले. तसेच, संघाला 167 धावांपर्यंत पोहोचवले. या सामन्यासाठी धोनीच्या संपूर्ण कुटुंबाने स्टेडिअममध्ये हजेरी लावली. यात एमएस धोनीची मुलगी झिवा धोनी हिनेदेखील सर्वांचे लक्ष वेधले. लेक झिवा यादरम्यान वडील महेंद्र सिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) याने षटकार मारताच शिट्टी वाजवून जल्लोष करताना, तर धोनीची पत्नी साक्षी धोनी (MS Dhoni Wife Sakshi Dhoni) हीदेखील आनंद साजरा करताना दिसली.

https://twitter.com/Who_Sumit/status/1656323823086768128?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1656323823086768128%7Ctwgr%5E1147517581edd636ec48412969f9092449613b85%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news24online.com%2Fsports%2Fcricket%2Fipl-2023-csk-vs-dc-ms-dhoni-daughter-ziva-cheers-her-father-see-video-brmp%2F232552%2F

https://twitter.com/Avinuuu/status/1656327247228444673?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1656327247228444673%7Ctwgr%5E1147517581edd636ec48412969f9092449613b85%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news24online.com%2Fsports%2Fcricket%2Fipl-2023-csk-vs-dc-ms-dhoni-daughter-ziva-cheers-her-father-see-video-brmp%2F232552%2F

दिल्लीला विजयासाठी 168 धावांचे आव्हान
सामन्याविषयी बोलायचं झालं, तर चेन्नईला 167 धावांपर्यंत पोहोचवण्यात शिवम दुबे याने सर्वाधिक धावांचे योगदान दिले. त्याने 12 चेंडूत 25 धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त ऋतुराज गायकवाड (24), अंबाती रायुडू (23), अजिंक्य रहाणे (21), रवींद्र जडेजा (21) आणि एमएस धोनी (20) यांनी 20हून अधिक धावांचे योगदान दिले. तसेच, डेवॉन कॉनवे हा 10 धावांवर तंबूत परतला. यावेळी दिल्लीकडून गोलंदाजी करताना मिचेल मार्श याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त अक्षर पटेलने 2, तर खलील अहमद, ललित यादव आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 1 विकेट नावावर केली. (ipl 2023 csk vs dc skipper ms dhoni daughter ziva cheers her father video viral)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाद करायचा नाय! चाहर 2018पासून गाजवतोय आयपीएलचा पॉवरप्ले, बोल्ट अन् शमीलाही पछाडत रचला विक्रम
टीकाकारांना विराटचे सडेतोड प्रत्युत्तर; सांगूनच टाकले, कुणाशी आहे त्याची लढाई

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---