भारतात सध्या महिला प्रीमिअर लीग स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेनंतर 31 मार्चपासून इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल 2023 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत रिषभ पंत दुखापतीमुळे दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळताना दिसणार नाही. मात्र, पंतसारख्याच पॉवर हिटरची कमतरता दिल्लीला भासणार नाही. कारण, दिल्लीला आणकी एक धुरंधर सापडला आहे, जो पंतसारखाच पॉवर हिटर आहे. विशेष म्हणजे, त्याने पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत गोलंदाजांना अक्षरश: घाम फोडला आहे. तो खेळाडू इतर कुणी नसून रायली रुसो आहे. रुसोने शुक्रवारी (दि. 10 मार्च) पीएसएल स्पर्धेच्या इतिहासातील वेगवान शतक झळकावले. त्याने शतक ठोकण्यासाठी 41 चेंडूंचा सामना केला. दिल्लीने आयपीएल 2023च्या लिलावात रुसोला 4.6 कोटींमध्ये संघात घेतले होते.
रायली रुसो (Rilee Russouw) हा पाकिस्तान सुपर लीग (Pakistan Super League) स्पर्धेत मुल्तान सुल्तान्स संघाकडून खेळत आहे. त्याने बाबर आझम (Babar Azam) याच्या नेतृत्वातील पेशावर जालमी संघाविरुद्ध 41 चेंडूत वेगवान शतक ठोकले. यापूर्वीही पीएसएल (PSL) स्पर्धेतील सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा विक्रम रुसोच्याच नावावर होता. त्याने क्वेटा ग्लेडिएटर्सविरुद्ध 2020मध्ये 43 चेंडूत शतक ठोकले होते. अशात रुसोच्या धावांच्या जोरावर मुल्तान संघाने 243 धावांचे आव्हान 5 चेंडू शिल्लक ठेवून गाठले. तसेच, मुल्तान संघाने टी20 इतिहासातील दुसऱ्या सर्वात मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना विजय मिळवला. यासोबतच या संघाने पीएसएल 2023 (PSL 2023) स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले आहे.
The massive total by Zalmi failed to secure them the sought-after victory because razor-sharp Rossouw stood tall for the Sultans 👏 #SabSitarayHumaray l #HBLPSL8 l #PZvMS pic.twitter.com/thbTKL3Q2X
— PakistanSuperLeague (@thePSLt20) March 10, 2023
बाबर आझमचा संघ 242 धावा करूनही पराभूत
दुसरीकडे, बाबर आझमच्या पेशावर जालमी संघाला अद्याप प्लेऑफमध्ये स्थान पक्के करता आले नाहीये. बाबरच्या संघाने मागील दोन्ही सामन्यात 240 हून अधिक धावांचे आव्हान उभे केले आणि दोन्ही सामने गमावले. यापूर्वी जेनस रॉय याने बाबरच्या संघाला पराभूत करण्यात मोलाचा वाटा उचललेला, तर आता रुसोच्या वादळात पेशावर संघाचे गोलंदाज उडून गेले.
Game lay gaya @MultanSultans 🤩👏🏻#SabSitarayHumaray l #HBLPSL8 l #PZvMS pic.twitter.com/rlIeUPPrG8
— PakistanSuperLeague (@thePSLt20) March 10, 2023
रुसोने मारले 8 चौकार अन् 12 षटकार
दक्षिण आफ्रिकेच्या रायली रुसोने 51 चेंडूंचा सामना करताना 8 षटकार आणि 12 चौकारांच्या मदतीने 121 धावा चोपल्या. म्हणजेच, त्याने 96 धावा या फक्त चौकार-षटकारांच्या मदतीने केल्या. या डावात रुसोने ज्या वादळी अंदाजात फलंदाजी केली, याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, त्याचे पहिले 5 फटके हे चौकार आणि षटकार होते. 17 चेंडूत रुसोने त्याचे अर्धशतक साकारले होते. 243 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुल्तानला पहिला धक्का 8 धावांवर बसला होता. मात्र, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना रुसोने कायरन पोलार्डसोबत संघाला 4 विकेट्सने विजय मिळवून दिला. (ipl 2023 delhi capitals will not miss rishabh pant as teams buy rilee rossouw hits fastest century in psl)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहित शर्माचा अहमदाबादेत राडा! 35 धावा करून तंबूत परतला, पण नावावर झाला जबरदस्त रेकॉर्ड
चौथ्या कसोटीत 9 धावा करताच पुजाराचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध जबरदस्त विक्रम, यादीत विराटचा नंबर शेवटचा