महिला प्रीमियर लीग 2023 चा दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅफिटल्स यांच्यांत खेळला गेला. आरसीबीची कर्णधार स्मृती मंधाना हिने सामना सुरू होण्यापूर्वी नाणेफेक जिंकून दिल्लीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स मैदानात उतरल्यानंतर संघाने मोठी धावसंख्या उभी केली. डब्ल्यूपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या रविवारी (5 मार्च) दिल्ली कॅपिटल्स संघाने साकारली.
दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघांमधील हा सामाना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला गेला. नाणेफेक गमावल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सला प्रथम फलंदाजी करावी लागली. दिल्लीच्या फलंदाजांनी आरसीबीने प्रथम गोलंदाजीचा घेतलेला निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरवला. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने 2 विकेट्सच्या नुकसानावर 223 धावा केल्या. डब्ल्यूपीएलच्या इतिहासातील ही सर्वात मोठी धावसंख्या ठरली. तत्पूर्वी शनिवारी (4 मार्च) स्पर्धेतील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात खेळला गेला. मुंबईने या सामन्यात 5 बाद 207 धावा कुटल्या, जी डब्ल्यूपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या ठरली.
दिल्ली संघासाठी या सामन्यात सलामीला शेफाली वर्मा (Shafali Verma) आणि मेग लॅनिंग (Meg Lanning) आले. शेफालीने 45 चेंडूत 84 धावा कुटल्या, तर लॅनिंगने 43 चेंडूत 72 धांवांचे योगदान दिले. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेली मारिजेन कॅप हिने 17 चेंडूत 39, तर चौथ्या क्रमांकावरील जेमिमाह रॉड्रिग्जने 15 चेंडूत 22 धावा कुटल्या. संघाला मिळालेल्या दोन्ही विकेट्स आरसीबीसाठी हेदर नाइट (Heather Knight) हिने घेतल्या.
(The record for the highest score in the second match of the WPL, Delhi Capitals’ record will be difficult to break even in the future)
बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IND vs AUS । चौथ्या कसोटीसाठी खेळपट्टी कशी बनवली जाणार? समोर आली महत्वाची माहिती
‘कॅप्टन’ विरुद्ध सिद्धू: अझहरूद्दीनमुळे नवज्योत पाजींनी अर्ध्यातच सोडलेला इंग्लंडचा दौरा, पण का?