आयपीएल 2023 मध्ये मंगळवारी (2 मे) गुणतालिकेत पहिल्या स्थानी असलेल्या गुजरात टायटन्स व अखेरच्या स्थानी असलेल्या दिल्ली कॅपिटल्स यांच्या दरम्यान सामना झाला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
Here are the Playing XIs 👌🏻👌🏻
What do you make of the two sides tonight 🤔
Follow the match ▶️ https://t.co/VQGP7wSZAj #TATAIPL | #DCvGT pic.twitter.com/1dkmU2fhWj
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2023
गतविजेता गुजरात टायटन्स या हंगामात देखील सर्वोत्तम कामगिरी करताना दिसत आहे. सहा विजयांसह ते गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहेत. तर, दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्स केवळ दोन विजय मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. हा सामना गमावल्यास दिल्लीचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.
या सामन्यासाठी गुजरातने आपल्या संघात कोणताही बदल केला नाही. तर, दिल्लीने जखमी मिचेल मार्शच्या जागी रायली रूसो याला संधी दिली.
गुजरात टायटन्स- वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, रशिद खान, नूर अहमद, मोहम्मद शमी, जोशुआ लिटल, मोहित शर्मा.
दिल्ली कॅपिटल्स- डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), रायली रूसो, मनीष पांडे, प्रियम गर्ग, रिपल पटेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, एन्रिक नोर्कीए, ईशांत शर्मा, अमन खान
(IPL 2023 Delhi Capitals Won Toss And Elected To Bowl First At Narendra Modi Stadium)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कोण आहे नवीन उल हक? ज्याच्यामुळे विराट अन् गंभीरचं झालं भांडण, अफगाणिस्तानातून आयपीएलपर्यंत कसा आला?
आधी मैदानात नंतर इंस्टावर, नवीनने घेतला विराटशी पंगा! म्हणाला, ‘तू हेच डिझर्व करतो…’