वानखेडे स्टेडिअम येथे पार पडलेल्या आयपीएल 2023 स्पर्धेच्या 31व्या सामन्यात मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्स आमने-सामने होते. या सामन्यात पंजाब किंग्स संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याने जबरदस्त गोलंदाजीचे दर्शन घडवले. अर्शदीपने अखेरच्या षटकात ज्याप्रकारे धावा वाचवल्या आणि आपल्या बेदक यॉर्करने दोन वेळा स्टंप मोडले, त्याची चोहोबाजूंनी प्रशंसा होत आहे. सामन्यानंतर अर्शदीपने त्याच्या या जबरदस्त गोलंदाजी कामगिरीबाबत मोठी प्रतिक्रिया दिली. त्याने सांगितले की, त्याने नो बॉलच्या मोठ्या समस्येपासून कशी सुटका मिळवली.
काय म्हणाला अर्शदीप?
सामन्यानंतर अर्शदीप सिंग याने त्याच्या शानदार गोलंदाजीविषयी मोठी प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, “जेव्हाही मी विकेट घेतो, तेव्हा खूपच चांगले वाटते. यावेळी मला खूपच आनंद होत आहे कारण संघाने विजय मिळवला आहे. मी रन-अप छोटा केला आहे, जेणेकरून मला नो-बॉलची समस्या येत नाही. मी यावेळी माझ्या क्रिकेटचा आनंद घेत आहे. माझ्या हृदयाची धडधड शेवटच्या षटकादरम्यान 120च्या जवळपासही नव्हती.”
अर्शदीपचे शेवटचे षटक
झाले असे की, पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाविरुद्ध विजय मिळवण्यासाठी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला अखेरच्या षटकात 16 धावांची गरज होती. अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) हे षटक टाकत होता. यावेळी त्याने पहिल्या चेंडूवर एक धाव दिली. त्यानंतर त्याने दुसरा चेंडू निर्धाव टाकला. यानंतर तिसऱ्या चेंडूवर भेदक यॉर्कर टाकला आणि तिलक वर्मा (Tilak Varma) याला त्रिफळाचीत केले. त्याच्या चेंडूचा इतका वेगवान होता की, स्टंप मोडून पडला. तसेच, चौथ्या चेंडूवर त्याने मुंबईच्या ‘इम्पॅक्ट प्लेअर’ नेहाल वढेरा याला त्रिफळाचीत केले. यावेळीही त्याने स्टंप मोडला. यानंतर शेवटच्या चेंडूवर अर्शदीपने 1 धाव खर्च केली आणि संघाला जबरदस्त विजय मिळवून दिला. यासह पंजाबने 13 धावांनी शानदार विजय मिळवला.
Sher aur uska shikaar 🦁#MIvPBKS #JazbaHaiPunjabi #SaddaPunjab #TATAIPL | @arshdeepsinghh pic.twitter.com/NJaox9duw9
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 22, 2023
अर्शदीपची गोलंदाजी
अर्शदीपने या सामन्यात 4 षटके गोलंदाजी करताना 29 धावा खर्च करत 4 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. या विकेट्समध्ये तिलक आणि नेहालव्यतिरिक्त सलामीवीर ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव या धुरंधरांचाही समावेश होता. (ipl 2023 fast bowler arshdeep singh reacts on his brilliant bowling in last over against mumbai indians)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘कारवाई तर होणारच…’, अर्शदीपने स्टंप तोडल्यावर पंजाब किंग्जच्या ट्विटवर मुंबई पोलिसांचे भन्नाट उत्तर
W W W W : कोच नेहराचा संदेश अन् श्वास रोखायला भाग पाडणारी लास्ट ओव्हर, मोहितकडून लखनऊची फलंदाजी उद्ध्वस्त