राजस्थान रॉयल्स संघ आयपीएल 2023 स्पर्धेत शानदार कामगिरी करत आहे. इतकेच नाही, तर राजस्थान फलंदाज आणि गोलंदाजही चमकदार प्रदर्शन करत आहेत. मात्र, संघात एक अष्टपैलू खेळाडू असा आहे, ज्याच्यासाठी हा हंगाम खूपच खराब ठरत आहे. तो खेळाडू इतर कुणी नसून रियान पराग आहे. त्याला आतापर्यंत एकाही सामन्यात मोठी खेळी करता आली नाहीये. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध जयपूर येथे खेळण्यात आलेल्या हंगामाच्या 26व्या सामन्यातही त्याला फार काही चांगली फलंदाजी करता आली नाही. त्याच्या संथ खेळीमुळे भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शास्त्रींनुसार, राजस्थान संघाला परागच्या संथ फलंदाजीचा फटका सहन करावा लागला.
रियान पराग (Riyan Parag) याने लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाविरुद्ध 12 चेंडूत नाबाद 15 धावांची खेळी साकारली. यादरम्यान त्याने 1 चौकार आणि 1 षटकारही मारला. मात्र, त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघ शेवटच्या षटकात येऊन 10 धावांनी पराभूत झाला.
‘रियान पराग याने पहिल्या 8 चेंडूंवर जास्त धावा केल्या नाहीत’
सामन्यानंतर रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी राजस्थान रॉयल्सच्या पराभवासाठी रियान परागच्या संथ फलंदाजीला जबाबदार ठरवले. ते म्हणाले की, “राजस्थान रॉयल्सने संजू सॅमसनचीही विकेट गमावली होती. तसेच, यशस्वी जयसवाल याचीही विकेट गमावली होती. तरीही, त्यांच्याकडे पुरेसे फलंदाज होते. माझ्या मते, जेव्हा रियान पराग फलंदाजीसाठी आला आणि सुरुवातीला ज्याप्रकारे त्याने त्याचे 8 चेंडू खेळले, त्यामुळे सामन्याची दिशा पालटली. दुसऱ्या बाजूला असलेला देवदत्त पडिक्कलही लयीत दिसला नाही.”
खरं तर, रियान पराग फलंदाजीसाठी 16व्या षटकात आला होता. त्यावेळी संघाला विजयासाठी 51 धावांची गरज होती. रियान पराग हा फिनिशर म्हणून खेळतो आणि त्याच्याकडून अपेक्षा होती की, तो शेवटी वेगवान फलंदाजी करत सामना संपवेल. मात्र, असे काहीच घडले नाही. त्याने 12 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 15 धावा केल्या. म्हणजेच, त्याने 10 चेंडूत फक्त 5 धावा केल्या. त्यामुळे त्याची जोरदार टीका होत आहे. (ipl 2023 former cricketer ravi shastri questions riyan parag s intent against lsg)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एकच मारला कच्चून मारला! बटलरने भिरकावला हंगामातील दुसरा सर्वात लांब षटकार, गंभीरची रिऍक्शन पाहाच
राजस्थान रॉयल्सवर अतिक्रमणचा आरोप; क्रीडा मंत्र्यांच्या जिद्दीपुढे दंड भरण्यास तयार