आयपीएलमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटपटूंच्या दुखापतीच्या बातम्या वारंवार येत आहेत. जवळपास 10 खेळाडूंनी दुखापतीमुळे चालू आयपीएल हंगामातून माघार घेतली आहे. पण काही खेळाडू आपल्या वैयक्तिक कारणास्तव देखील आयपीएल खेळत नाहीत. बांगलादेशचा दिग्गज अष्टपैलू शाकिब अल हसन याने वैयक्तिक कारणास्तव आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला. असात कोलकाता नाईट रायडर्स संघाने शाकिबच्या जागी इंग्लंडच्या जेसन रॉय याला संधी दिली.
शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) याला आयपीएल 2023 हंगामापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सने 1.5 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. पण राष्ट्रीय संघाचे सामने आणि काही वैयक्तिक कारणास्तव यावर्षी आयपीएलसाठी उपलब्ध होऊ शकला नाही. केकेआरसाठी हा एक मोठा धक्का होता. पण येत्या सामन्यांमध्ये इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जेसन रॉय () शाकिबची कमी भरून काढण्यासाठी उपलब्ध असेल. रॉयची टी-20 कारकीर्द जबरदस्त राहिली असून त्याने या फॉरमॅटमध्ये 6 शतके ठोकली आहेत. केकेआरने तब्बल 2.8 कोटी रुपयांमध्ये जेसन रॉय याला संघात घेतले आहे. रॉयची बेस प्राइज जरी 1.5 कोटी रुपये असली, तरी केकेआरला त्याच्यासाठी जवळपास दुप्पट रक्कम मोजावी लागली आहे. रॉय इंग्लंडसाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळत असला, तरी व्हाइट बॉल क्रिकेटवर त्याची चांगली पकड असल्याचे दिसून आले आहे.
टी-20 कारकिर्दीत ठोकलेत 6 शतक
रॉयने आपल्या टी-20 कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 313 सामने खेळले आहेत. यामधील 307 डावांमध्ये त्याने फलंदाजी करताना 27.77च्या सरासरीने आणि 141.90च्या स्ट्राईक रेटने 8110 धावा केल्या. यादरम्यान शतक आणि 53 अर्धशतके देखील रॉयच्या भॅटमधून निघाले. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 145 धावा आहे.
रॉयची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
रॉयने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत इंग्लंडसाठी मोठे योगदान दिले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 5, वनडे क्रिकेटमध्ये 116, आणि आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 64 सामने खेळले आहेत. कसोटी फॉरमॅटमध्ये रॉयने 18.70च्या सरासरीने 187 धावा केल्या. वनडे फॉरमॅटमध्ये त्याने 39.91च्या सरासरीने 4271 धावा केल्या. तर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रॉयने 24.15च्या सरासरीने 1522 धावा केल्या आहेत. (Jason Roy replaces Shakib Al Hasan in KKR squad)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पंच नितीन मेननचं स्वप्न खरं होणार! पहिल्यांदाच करणार ‘या’ महत्वाच्या मालिकेत अंपायरिंग
दुखापतग्रस्त राज बावाच्या जागी पंजाब किंग्जमध्ये दमदार खेळाडूची एन्ट्री, फ्रँचायझीने मोजली एवढी किंमत