इंडियन प्रीमिअर लीग 2023 मध्ये रविवारी (9 एप्रिल) डबल हेडर सामने खेळले गेले. दिवसातील पहिला सामना गतविजेता गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्या दरम्यान खेळला गेला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या रोमांचक सामन्यात केकेआरने तीन गडी राखून विजय संपादन केला. युवा फलंदाज रिंकू सिंगने अखेरच्या पाच चेंडूंवर पाच षटकार ठोकत केकेआरला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
Match 13. Kolkata Knight Riders Won by 3 Wicket(s) https://t.co/G8bESXjTyh #TATAIPL #GTvKKR #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 9, 2023
गुजरातचा कर्णधार राशिद खानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. गिल व साहा यांनी 33 धावांची भागीदारी केली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या साई सुदर्शन याने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक पूर्ण केले. अष्टपैलू विजय शंकर याने केवळ 21 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहत 24 चेंडूवर 63 धावा केल्या. यामध्ये त्याने चार चौकार व 5 षटकारांचा समावेश होता. यासह गुजरातने प्रथमच आयपीएलमध्ये 200 धावांचा टप्पा प्रथम फलंदाजी करताना पार केला.
या धावांचा पाठलाग करताना केकेआरचे पहिले तीन फलंदाज केवळ 28 धावांवर बाद झाले. त्यानंतर कर्णधार नितिश राणा व व्यंकटेश अय्यर यांनी केकेआरला सामन्यात पुनरागमन करून दिले. दोघांनी चौथ्या गड्यासाठी शतकी भागीदारी केली. राणाने 45 धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूने अय्यरने 40 चेंडूंवर 83 धावांचा तडाखा दिला. मात्र, राशिद खानने सतराव्या षटकात सामना पालटला. त्याने रसेल,धरीन व ठाकूर यांना सलग बाद करत हॅट्रिक पूर्ण केली. केकेआरला अखेरच्या षटकात विजयासाठी 29 धावांची गरज होती. उमेश यादवने पहिल्या चेंडूवर एक धाव घेतल्यानंतर उर्वरित पाचही चेंडूवर रिंकू सिंगने षटकार मारत कोलकात्याला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
(IPL 2023 KKR Beat Gujarat Titans By 3 Wickets Rinku Singh Hits 5 Consecutive Sixes)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
राशिदने केली करामत! केकेआरविरुद्ध घेतली ‘ऐतिहासिक’ हॅट्रिक,आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून पहिलाच
विजय शंकरच्या झंजावातामुळे गुजरातची धावसंख्या 200 पार, ब्रँडन मॅक्युलमचा मोठा विक्रमही मोडीत