रविवारी (9 एप्रिल) गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आमना सामना झाला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी केली. अष्टपैलू विजय शंकर याच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर गुजरातने निर्धारित 20 षटकांमध्ये 4 बाद 204 धावा कुटल्या. यादरम्यान विजय शंकरच्या बॅटमधून अर्धशतक निघालेच, पण एका खास यादीत त्याने आपली जागाही पक्की केली.
विजय शंकर (Vijay Shankar) याने आपल्या होम ग्राउंडवर खेळताना अवघ्या 24 चेंडूत 63 धावा केल्या. यादरम्यान 4 चौकार आणि 5 षटकार त्याच्या बॅटमधून निघाले. 18व्या षटकात गुजरातची धावसंख्या चार बाद 159 धावा होती. पण शेवटच्या दोन षटकांमध्ये संघाने 45 धावा कुटल्या आणि धावसंख्या 204पर्यंत पोहचवली. आपल्या डावातील शेवच्या 11 चेंडूत विजय शंकरने 41 धावा कुटल्या. आयपीएलच्या इतिहासात तो आता चौथा खेळाडू ठरला आहे, ज्याने शेवटच्या दोन षटकांमध्ये सर्वाधिक धावा केल्या.
या यादीत पहिल्या क्रमांकावर विराट कोहली आहे. विराटने आयपीएल 2016मध्ये गुजरात लायन्सविरुद्धच्या एका सामन्यातील शेवटच्या दोन षटकांमध्ये 10 चेंडू खेळून 44 धावा केल्या होत्या. यादीत दुसऱ्या क्रमांकावर रविंद्र जडेजा आहे. जडेजाने विराट कोहलीच्या आरसीबीविरुद्ध शेवटच्या दोन षटकांमध्ये 12 चेंडू खेळले आणि 44 धावा कुटल्या होत्या. आयपीएल 2021 मध्ये जडेजाने ही कामगिरी केली होती. तिसऱ्या क्रमांकावर केएल राहुल आहे, ज्याने 2020मध्ये आरसीबीविरुद्ध शेवटच्या दोन षटकांमध्ये 9 चेंडू खेळून 42 धावा कुटल्या होत्या. विजय शंकर आता या यादीत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. पाचव्या क्रमांकावर ब्रँडन मॅक्युलम आहे, ज्याने 2008 म्हणजेच पहिल्या आयपीएल हंगामात आरसाबीविरुद्ध शेवटच्या दोन षटकात 11 चेंडू खेळून 41 धावा केल्या होत्या.
Vijay Shankar smashed 41* runs in the last 11 balls in 19th & 20th over. pic.twitter.com/Eg6vvodnSK
— Johns. (@CricCrazyJohns) April 9, 2023
शेवटच्या दोन षटकात (19 आणि 20व्या षटकात) सर्वाधिक धावा करणारे खेळाडू (आयपीएलमध्ये)
44 (10) – विराट कोहली विरुद्ध गुजरात लायन्स, 2016
44 (12) – रविंद्र जडेजा विरुद्ध आरसीबी, 2021
42 (9) – केएल राहुल विरुद्ध आरसीबी, 2020
41 (11) – विजय शंकर विरुद्ध केकेआर, 2023
39 (11) – ब्रँडन मॅक्युलम विरुद्ध आरसीबी, 2008
(Vijay Shankar has overtaken Brendon McCullum in the list of highest run-scorers in the last two overs)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फ्रँचायझींनी कोट्यवधी खर्च केलेले खेळाडू, पण स्पर्धेत फॉर्मला लागलंय ग्रहण, यादीत अनेक दिग्गजांची नावे
VIDEO: वानखेडेवर झाला ‘धोनी..धोनी’चा जयघोष, व्हिडिओ होतोय वेगाने व्हायरल