---Advertisement---

ईडन गार्डन्सवर केकेआरने जिंकली नाणेफेक, सीएसकेला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण

---Advertisement---

आयपीएल 2023 मध्ये रविवारी (23 एप्रिल) दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स असा खेळला गेला. कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात केकेआरचा कर्णधार नितिश राणा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या विजयाची हॅट्रिक करण्यासाठी या सामन्यात पाऊल ठेवले. त्यांना पहिल्या स्थानी पोहोचण्याची संधी असेल. चेन्नईने या सामन्यासाठी आपल्या संघात एकही बदल केला नाही. दुसरीकडे मागील दोन सामन्यात पराभूत व्हावे हवे लागलेल्या यजमान संघाने दोन बदल करण्यास प्राधान्य दिले. मागील सामन्यात संधी दिलेल्या लिटन दास याच्या जागी यष्टीरक्षक एन जगदीशन याला संघात स्थान दिले गेले. तर, नामिबियाचा दिग्गज अष्टपैलू डेव्हिड विजे याला देखील खेळण्याची संधी मिळाली.

चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग इलेव्हन-

ऋतुराज गायकवाड, डेवॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार), मथीशा पथिराना, तुषार देशपांडे, महेश थिक्षाना

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन-

एन जगदीसन, जेसन रॉय, नितीश राणा(कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंग, सुनील नरीन, डेव्हिड विसे, कुलवंत खेजरोलिया, सुयश शर्मा, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती

बातमी अपडेट होत आहे

(IPL 2023 KKR Skipper Nitish Rana Won Toss CSK Batting First At Eden Gardens)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---