इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा अंतिम सामना गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघात सोमवारी (दि. 29 मे) खेळला जाणार आहे. रविवारी (दि. 28 मे) निश्चित दिवशी पावसाने व्यत्यत आणल्यामुळे सामना खेळला जाऊ शकला नाही आणि सामना राखीव दिवसावर ढकलण्यात आला. तसं पाहिलं, तर या हंगामात शुबमन गिल, यशस्वी जयसवाल, रिंकू सिंग आणि नूर अहमद यांच्यासह अनेक युवा खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत वाहवा मिळवली. यामध्ये सर्वाधिक चर्चा रिंकू सिंग याचीही झाली.
अखेरच्या षटकात ठोकले होते 5 षटकार
रिंकू सिंग (Rinku Singh) चर्चेत राहण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यापैकीच एक म्हणजे, गतविजेत्या गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाविरुद्धच्या एका सामन्यात रिंकूने अखेरच्या षटकात सलग 5 चेंडूत 5 षटकार मारले होते. त्याच्या या विस्फोटक फलंदाजीमुळे कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाला विजय मिळवून दिला होता. रिंकूची ही वादळी खेळी चाहत्यांना अनेक वर्षे आठवेल. या सामन्यात त्याने 21 चेंडूत 1 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 228.57च्या स्ट्राईक रेटने नाबाद 48 धावा केल्या होत्या.
वडील करतात सिलेंडर डिलीव्हरीचे काम
या विस्फोटक खेळीमुळे सामान्य भागातून आलेल्या रिंकूच्या लोकप्रियता लक्षणीय वाढ केली. यूपीच्या अलीगड (Aligarh) शहरातील रिंकूचे वडील सिलेंडर डिलीव्हरीचे काम करतात. स्वत: रिंकूने आर्थिक संकटात झाडू मारण्यासारखी कामे केली आहेत. मात्र, रिंकू आता क्रिकेट जगतातील मोठे नाव झाला आहे. प्रसिद्धी मिळाल्यानंतरही त्याने मातीशी जोडलेली नाळ तोडली नाहीये. सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यात आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत शानदार प्रदर्शन केल्यानंतर रिंकू अलीगड येथील एका ग्राऊंडवर पोहोचला.
यावेळी त्याला मैदानावर येताना पाहून लहान मुले त्याच्या पाया पडू लागले आणि लाजाळू रिंकूनेही त्यांना असे न करण्याचा आग्रह केला. यावेळी तो म्हणत होता की, “पाय पकडू नको भावा. समजत नाही का?”
Rinku Singh reached home after IPL. Fans reaction. Eagerly waiting to see rinku Singh on Indian jersey. A great middle order batsman.#rinku #IPL #BCCI #ICC #WTCFinal #WTCFinal2023 pic.twitter.com/YUMGusqiSK
— Pavilion End ???? (@bobss_p32945) May 29, 2023
रिंकूची हंगामातील कामगिरी
आयपीएल 2023 स्पर्धेत रिंकून केकेआरसाठी 14 सामन्यात 59.25च्या सरासरीने आणि 149.52च्या स्ट्राईक रेटने 472 धावा केल्या. या धावा करताना त्याने 4 अर्धशतकेही झळकावली. यामध्ये नाबाद 67 ही त्याची हंगामातील सर्वोत्तम खेळी आहे. याव्यतिरिक्त रिंकूने कठीण परिस्थितीत आपल्या दृष्टीकोनाने सर्वांना प्रभावित केले. केकेआरसाठी फिनिशरची भूमिका साकारणाऱ्या या फलंदाजाने आयपीएल 2023मध्ये 31 चौकार आणि 19 षटकार मारले आहेत. (ipl 2023 kkr star cricketer rinku singh reached hometown aligarh won hearts with his simplicity see video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WTC फायनलसाठी पंचांची घोषणा! टीम इंडियासाठी ‘अनलकी’ ठरलेले पंचही सामील
‘त्याने काय आयुष्यभर खेळावं…?’, धोनीच्या IPL निवृत्तीवर स्पष्टच बोलले कपिल देव