इंंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत काही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. यापैकीच एक नियम म्हणजे इम्पॅक्ट प्लेयर हा होय. हा नियम सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र, या नियमाचा फायदा पहिल्या दोन सामन्यात फारसा झाला नाही. मात्र, लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघातील तिसऱ्या सामन्यात या नियमाचा चांगलाच फायदा झाला. लखनऊच्या डावातील अखेरच्या चेंडूवर इम्पॅक्ट प्लेअरच्या रूपात कृष्णप्पा गौथम फलंदाजीला आला. त्याने खेळपट्टीवर येताच षटकार ठोकत आपल्या संघाची धावसंख्या 193 करून टाकली. गौथमने एकाच चेंडूचा पुरेपूर फायदा उचलला. आता त्याच्या प्रदर्शनामुळे ट्विटरवर प्रतिक्रियांचा महापूर आला आहे.
नाणेफेक जिंकत दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाने गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघ फलंदाजीला आला. संघाची सुरुवात खराब राहिली, पण काईल मेयर्स याने 73 आणि निकोलस पूरन याने 36 धावा करून संघाला मोठी धावसंख्या करून देण्यात मोलाचा वाटा उचलला. यांच्याव्यतिरिक्त इतर फलंदाजांनीही शानदार फटकेबाजी केली. अशाप्रकारे संघाने निर्धारित 20 षटकात 6 विकेट्स गमावत 193 धावा केल्या.
अखेरच्या चेंडूवर इम्पॅक्ट प्लेअर (Impact Player) आणल्याबद्दल लखनऊ संघाची जोरदार प्रशंसा झाली. चला तर ट्विटरवर आलेल्या प्रतिक्रियांवर एक नजर टाकूया…
चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाच्या एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, “कृष्णप्पा गौथम इम्पॅक्ट प्लेअर (Krishnappa Gowtham Impact Player) म्हणून फक्त 1 चेंडूवर फलंदाजीसाठी आला आणि त्याने 6 धावा केल्या. आमच्याकडे तुषार देशपांडे होता.”
Krishnappa Gowtham came as an impact player just to bat for 1 ball and he scored 6 runs and then we had Tushar Deshpande as an impact player 😭#TATAIPL2023 | #LSGvDC | #IPL2023 | #TATAIPL | #CricketTwitter | #LSGvsDC
— Paritosh Kumar (@ParitoshK_2016) April 1, 2023
दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “हा काहीतरी इम्पॅक्ट होता, एकच चेंडू खेळला आणि एक षटकार मारला.” आणखी एकाने असे लिहिले की, “हा गौथमचा इम्पॅक्ट होता. कर्णधार आणि व्यवस्थापनाकडून शानदार पाऊल.”
That was some Impact, played one ball and hammered it for a SIX #KrishnappaGowtham #ImpactPlayer #IPL #LSGvDC
— Slipstream Cricket (@SlipstreamCrick) April 1, 2023
That was some impact by Gowtham 😬
Brilliant move by Captain & management 🫡#ipl2023 #LSGvDC— MD JISHAN (@im_Jishan_) April 1, 2023
What an impact in the end by impact player Krishnappa Gowtham#LSGvDC | #IPL2023 | #LucknowSuperGiants | #LSG | #GazabAndaz | #YehHaiNayiDilli | #KLRahul | #TATAIPL2023 | #LSGBrigade | #IPLonJioCinema | #BharatArmy pic.twitter.com/ev9gwuchst
— Deepak. (@CricCrazyDeepak) April 1, 2023
Ikr! The six off the last ball!! OP strategy by LSG!#LSGvDC
— Kaush (@kaushkom) April 1, 2023
Krishnappa Gowtham came in as an impact player and smashed a six on the final ball. pic.twitter.com/nJuVDrFwCG
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 1, 2023
लखनऊ सुपर जायंट्स संघाने 193 धावा करताना आपल्या 6 विकेट्स गमावल्या. दिल्लीकडून यावेळी गोलंदाजी करताना खलील अहमद आणि चेतन साकारिया यांनी प्रत्येकी 2 विकेट्स नावावर केल्या. तसेच, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. (ipl 2023 krishnappa gowtham last ball six as impact player against delhi capitals see twitter reactions)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तुम्ही धोनीकडून अशी अपेक्षा करू शकत नाही…’, चेन्नईच्या पराभवानंतर सेहवागचे रोखठोक वक्तव्य
आयपीएल 2023 मध्ये दुसऱ्याच दिवशी कॅरेबियन तडका! मेयर्सने पदार्पणातच केली षटकारांची आतिषबाजी