गतविजेत्या गुजरात टायटन्स संघाला आयपीएल 2023 स्पर्धेच्या 23व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने धोबीपछाड दिला. हा सामना राजस्थानने 3 विकेट्सने जिंकत गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावले. या विजयात कर्णधार संजू सॅमसन आणि शिमरॉन हेटमायर यांचे मोलाचे योगदान होते. विशेष म्हणजे, विजयानंतर राजस्थानचे क्रिकेट संचालक कुमार संगकाराने कर्णधार संजू सॅमसन याचे कौतुक केले. तसेच, हैराण करणारे वक्तव्यही केले.
सामना जिंकल्यानंतर मुख्य प्रशिक्षक कुमार संगकारा (Kumar Sangakkara) संजू सॅमसन (Sanju Samson) याला म्हणाला की, “जेव्हा तू लयीत असतो, तेव्हा तुझ्यापुढे राशिद खान आणि मुथय्या मुरलीधरनसारखेही गोलंदाज काही करू शकत नाहीत.”
संजू सॅमसन याने गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाविरुद्ध तडाखेबंद खेळी साकारली. पॉवरप्लेमध्ये दोन विकेटस गमावल्यानंतर राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघ अडचणीत होता. मात्र, संजूने शानदार फटकेबाजी केली आणि संघाला अडचणीतून बाहेर काढले. संजूने सामन्यात 32 चेंडूत 60 धावांची तडाखेबंद खेळी केली. यामध्ये 3 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. यावेळी त्याने गुजरातचा आघाडीचा गोलंदाज राशिद खान (Rashid Khan) याला एकाच षटकात 3 षटकार चोपले.
Attack MODE 🔛! @IamSanjuSamson took on Rashid Khan & how 👌 👌
Watch those 3⃣ SIXES 💪 🔽 #TATAIPL | #GTvRR | @rajasthanroyals
Follow the match 👉 https://t.co/nvoo5Sl96y pic.twitter.com/0gG3NrNJ9z
— IndianPremierLeague (@IPL) April 16, 2023
‘तू राशिद खानला वाईटरीत्या धुतले’
संजूच्या शानदार खेळीमुळे संगकाराही खुश झाला. त्याने सामन्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये कर्णधार संजूचे तोंडभरून कौतुक केले. तो म्हणाला की, “कर्णधार, तू पॉवरप्लेमध्ये जेव्हा संघ अडचणीत होता, त्याला बाहेर काढलेच, पण त्यानंतर राशिद खानच्या षटकात ज्याप्रकारे षटकार मारले, त्यामुळे सामना पालटला. ते एक गेमचेंजर होते. तो त्यांच्या संघाचा सर्वोत्तम गोलंदाज होता आणि जगातील सर्वोत्तम टी20 गोलंदाज मानला जातो. मात्र, तू त्याला वाईटरीत्या धुतले. यावरून समजते की, जेव्हा तू लयीत असतो, तेव्हा काहीही शक्य आहे. मग त्याने फरक पडत नाही की, तो राशिद खान आहे, मुरलीधरन आहे किंवा शेन वॉर्न आहे. चेंडू खेळ गोलंदाजांना नाही. तू खूपच शानदार फलंदाजी केली.”
https://www.instagram.com/reel/CrHEoe8PyD6/?utm_source=ig_embed&ig_rid=0f81ade8-e294-4344-a32a-6e49f6f06d2e
For his 2⃣6⃣-ball5⃣6⃣*-run blitz, @SHetmyer wins the Player of the Match award as @rajasthanroyals beat #GT 👏 👏
Scorecard 👉 https://t.co/nvoo5Sl96y #TATAIPL | #GTvRR pic.twitter.com/69ZiQzPpRj
— IndianPremierLeague (@IPL) April 16, 2023
खरं तर, प्रथम फलंदाजी करताना गुजरात संघाने निर्धारित 20 षटकात 7 विकेट्स गमावत 177 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने 19.2 षटकात 7 विकेट्स गमावत आव्हान पूर्ण केले. या पराभवामुळे गुजरात गुणतालिकेत 6 गुणांसह तिसऱ्या स्थानी पोहोचला. (ipl 2023 kumar sangakkara praise sanju samson said you can smash anyone be it warne muralitharan or rashid khan)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
झुंजार खेळी करणाऱ्या सूर्याची मुंबईच्या विजयानंतर मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘वानखेडेवर आम्हाला…’
सचिन-अर्जुन तेंडुलकरच्या आधी किती बाप-लेक खेळलेत आयपीएल? वाचा थोडक्यात