इंडियन प्रीमिअर लीग 2023मध्ये शनिवारी (1 एप्रिल) दिवसातील दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स यांच्या दरम्यान खेळला गेला. लखनऊ येथील इकाना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात यजमान संघाने दिल्लीचे आव्हान यशस्वीरित्या मोडून काढले. फलंदाजांनी उभारलेल्या मोठ्या धावसंख्येनंतर गोलंदाजांनी दिल्लीच्या फलंदाजांना डोके न वर काढू देता 143 धावांवर रोखले. यासह लखनऊने विजयाने हंगामाची सुरुवात केली.
A comprehensive victory at home to mark the first win of the season! 🙌🏻@LucknowIPL clinch a 50-run victory over #DC!
Scorecard ▶️ https://t.co/086EqX92dA #TATAIPL#TATAIPL | #LSGvDC pic.twitter.com/XFhP1IkzJo
— IndianPremierLeague (@IPL) April 1, 2023
या सामन्यात प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर लखनऊच्या फलंदाजांनी याचा पुरेपूर फायदा मिळवला. कर्णधार राहुल लवकर बाद झाल्यानंतर पदार्पण करत असलेल्या कायले मेयर्स याने 38 चेंडूवर 2 चौकार व तब्बल 7 षटकारांच्या मदतीने 73 धावा कुटल्या. मधल्या फळीत दीपक हुडा, कृणाल पंड्या व मार्कस स्टॉयनिस यांनी त्याला साथ दिली.निकोलस पूरनने 21 चेंडूवर 36 व व आयुष बडोनीने 7 चेंडूत 18 धावा करून संघाला 193 पर्यंत पोहोचवले. दिल्लीसाठी चेतन सकारिया व खलील अहमद यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.
या धावांचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात चांगली झाली होती. मात्र, पाचव्या षटकात 41 धावांवर मार्क वूड याने पृथ्वी शॉ व त्याच्या पुढील चेंडूवर मिचेल मार्श यांना त्रिफळाचीत केले. त्यानंतर पुढील षटकात त्याने सर्फराज खानलाही तंबूत पाठवले. रायली रुसोने आक्रमक 30 धावा केल्या. मात्र, तो देखील मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. एका बाजूने इतर फलंदाज बाद होत असताना कर्णधार डेव्हिड वॉर्नरने अर्धशतक पूर्ण केले. मात्र, वेगाने धावा करण्याचा प्रयत्नात तो देखील बाद झाला. अक्षर पटेलने काही मोठे फटके खेळत सामन्यात रंगत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, दिल्लीचा संघ केवळ 143 पर्यंत मजल मारू शकला. मार्क वूडने सर्वाधिक 5 पाच बळी मिळवले.
(IPL 2023 Lucknow Supergiants Beat Delhi Capitals By 50 Runs Mayers Wood Shines)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तुम्ही धोनीकडून अशी अपेक्षा करू शकत नाही…’, चेन्नईच्या पराभवानंतर सेहवागचे रोखठोक वक्तव्य
आयपीएल 2023 मध्ये दुसऱ्याच दिवशी कॅरेबियन तडका! मेयर्सने पदार्पणातच केली षटकारांची आतिषबाजी