---Advertisement---

पराभवानंतर बुमराहच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला रोहित; म्हणाला, ‘मागील 6-8 महिन्यांपासून त्याच्याशिवाय…’

Rohit-Sharma
---Advertisement---

रविवारी (दि. 2 एप्रिल) इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेच्या पाचव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघ आमने-सामने होते. या सामन्यात बेंगलोरने 8 विकेट्सने विजय मिळवला. सालाबादप्रमाणे मुंबईने स्पर्धेतील पहिला सामना गमावला. या स्पर्धेत मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह खेळताना दिसणार नाही. त्याची उणीव संघाला भासत आहे. मात्र, पराभवानंतर संघाचा कर्णधार रोहित शर्मा जसप्रीत बुमराह याच्याविषयी जे बोलून गेला, ते खूपच महत्त्वाचे होते.

बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर रंगलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला होता. यावेळी मुंबईने तिलक वर्मा (Tilak Varma) याच्या 84 धावांच्या जोरावर 7 विकेट्स गमावत 171 धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोरकडून विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस (Virat Kohli And Faf Du Plessis) यांनी पहिल्या विकेटसाठी 148 धावांची भागीदारी रचली. तसेच, संघाला 172 धावांचे आव्हान 16.2 षटकात मिळवून दिले. तसेच, 8 विकेट्सने विजय मिळवत स्पर्धेत शानदार सुरुवात केली.

या सामन्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) याला जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याच्या अनुपस्थितीबद्दल विचारणा करण्यात आली. यावेळी रोहित स्पष्टपणे बोलला की, याबाबत जास्त विचार करण्याची गरज नाहीये. तो म्हणाला की, “मागील सहा ते आठ महिन्यांपासून जसप्रीत बुमराहशिवाय खेळत आहे. भारतासाठीही. अर्थातच, हा एक वेगळा सेटअप आहे. कोणा ना कोणाला पुढे येऊन ती जागा भरण्याचा प्रयत्न करावा लागेल.”

मुंबईचा हा सलग 11वा हंगाम आहे, जिथे त्यांनी पहिला सामना जिंकला नाहीये. रोहित याविषयी बोलताना म्हणाला की, “आम्ही यावर सातत्याने चर्चा करू शकत नाही. तुम्ही फक्त त्याच गोष्टी नियंत्रित करण्याचा प्रयत्न करू शकता, ज्यावर तुमचे नियंत्रण आहे. तसेच, ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणात नाहीत, त्याचे तुम्ही काहीही करू शकत नाहीत. दुखापत तुमच्या नियंत्रणात नाहीये.” रोहित असेही म्हणाला की, “आमच्या संघात जे इतर खेळाडू आहेत, ते खूपच प्रतिभावान आहेत. फक्त एवढं आहे की, त्यांनी जास्त आयपीएल खेळले नाहीये. आम्हाला त्यांना पाठिंबा द्यायचा आहे.”

यानंतर रोहितने 20 वर्षीय तिलक वर्मा याचेही कौतुक केले. तिलकने 46 चेंडूत 84 धावांची खेळी साकारत मुंबईला संकटातून बाहेर काढले. मुंबई 8.5 षटकात 4 विकेट्स गमावत 48 धावांवर खेळत होता. त्यावेळी तिलकने शानदार प्रदर्शन करत संघाची धावसंख्या 7 विकेट्स गमावत 171 धावांवर पोहोचवली. (ipl 2023 mi vs rcb rohit sharma On jasprit bumrah says this read here)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चेन्नईसाठी पहिल्यांदाच चेपॉकमध्ये खेळणार नाही रैना, ‘हा’ नव्या दमाचा पठ्ठ्या पाडणार धावांचा पाऊस
हैदराबादचा ‘सूर्य’ बुडवत युझवेंद्र चहलचा भीमपराक्रम! बनला टी20त ‘असा’ कारनामा करणारा एकमेव भारतीय

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---